गडचिरोली : भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रांतर्गतच्या नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा व पेनगुंडा ग्रामस्थांनी एकत्र येत रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षलींची चार स्मारके उद्ध्वस्त केली.नक्षलींमुळे विकास रखडल्याचे नक्षलग्रस्त भागातील नागरिकांच्या लक्षात येत आहे. नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा, पेनगुंडा ग्रामस्थांनी आठ दिवसांपूर्वी ग्रामसभा घेऊन गावाच्या हद्दीतील नक्षली स्मारक तोडण्याचा निर्णय घेतला होता.नियोजनाप्रमाणे गावकºयांनी एकत्र येत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षली स्मारके उद्ध्वस्त केले. नक्षलींना यापुढे कोणत्याही प्रकारची मदत दिली जाणार नाही, अशी शपथ या वेळी ग्रामस्थांनी घेतली. विशेष म्हणजे ही गावे आतापर्यंत नक्षलींचा गड मानली जात होती.
चार नक्षली स्मारके गावकऱ्यांकडून उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 04:58 IST