शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड मार्गावरील चार ठेंगणे पूल अडवितात वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:38 IST

दुर्गम भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात येण्यासाठी भामरागड-आलापल्ली हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर चंद्र नाला, ताडगाव नाला, तसेच कुडकेली ...

दुर्गम भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात येण्यासाठी भामरागड-आलापल्ली हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर चंद्र नाला, ताडगाव नाला, तसेच कुडकेली व कुमरगुडा गावाजवळ नाला आहे. या नाल्यांवर ठेंगणे पूल व रपटे आहेत. पावसाळ्यात पुलांवरून पुराचे पाणी वाहत असते. दरवर्षी पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी उंच पूल बांधण्याची मागणी हाेत आहे; मात्र याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने याहीवर्षी पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होणार आहेत.

भामरागड-आलापल्ली मार्गावर जागाेजागी खड्डे पडून दुरुवस्था झाली आहे. आलापल्लीपर्यंतचे ६५ कि.मी. अंतर गाठण्यासाठी अडीच ते तीन तास प्रवास करावा लागताे. परंतु, सध्या रस्ता बांधकाम सुरू असल्याने ही समस्या सुटणार आहे. तसेच पेरमिली गावाजवळचा मोठा नाला व बांडिया नदीसह पर्लकोटा या मोठ्या नदीवरही उंच पूल बांधण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी चार-पाच दिवस भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटताे. परंतु, या पुलांचे बांधकाम झाल्यास संपर्क तुटणार नाही. बारमाही वाहतूक सुरू राहील. चंद्रनाला, कुडकेली नाला, ताडगाव व कुमरगुडा नाल्यांवर उंच पूल बांधकाम करण्याबाबत काहीच हालचाली दिसून येत नाही. पावसाळ्यात चंद्रनाला पार केला तरी कुडकेली नाला अडवितो. त्यानंतर पेरमिलीपर्यंतही परत जाता येत नाही. तसेच एकवेळ चंद्रनाला व कुडकेली नाला पार केला तर कधी ताडगाव नाला अडवितो किंवा ताडगाव नाला पार केला तर कुमरगुडा नाला वाट अडविताे. पावसाळ्यात थाेडाही पाऊस आल्यास ठेंगणे पूल व रपट्यांवरून पाणी वाहते. पावसाळ्यात ही स्थिती अनेकदा निर्माण हाेते. पायदळ, सायकल व मोटार सायकलस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. खासगी वाहनधारक व रात्री मुक्कामाच्या बसेस पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करतात. त्यामुळे चारही नाल्यांवर उंच पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.

बाॅक्स

अनावश्यक ठिकाणी पुलांचे बांधकाम

भामरागड-आलापल्ली मार्गावर अनेक ठिकाणी उंच पुलांची आवश्यकता आहे. परंतु, या ठिकाणी रपटे बांधून काम निभावण्यात आले. परंतु, ज्या ठिकाणी पुलाची अत्यंत आवश्यकता नसतानाही तेथे पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. अत्यावश्यक ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्याकडे दुर्लक्ष करून अनावश्यक ठिकाणी पुलांचे बांधकाम केले आहे. भामरागड-आलापल्ली मार्गावर उंच पुलांचे बांधकाम करण्यासाठी अडचणी काय? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

===Photopath===

080521\08gad_4_08052021_30.jpg

===Caption===

उंच पूल बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेला कमी उंचीचा रपटा.