शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शिकार करणाऱ्या चौघांना अटक

By admin | Updated: October 20, 2016 02:40 IST

तालुक्यातील मालेवाडा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कोहका वन कक्ष क्रमाक ३९८ च्या राखीव जंगलात रानडुकराची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावणाऱ्या

रानडुक्कर मारले : कोहका जंगल परिसरातील घटना; वन विभागाने केली कारवाईकुरखेडा : तालुक्यातील मालेवाडा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कोहका वन कक्ष क्रमाक ३९८ च्या राखीव जंगलात रानडुकराची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावणाऱ्या चार आरोपींना रानडुकराच्या मांसासह वनाधिकाऱ्यांनी अटक केल्याची घटना बुधवारी घडली. सदर चारही आरोपींना कुरखेडा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.याप्रकरणातील श्यामलाल बोगा (४२) रा. कोहका, बरन मडावी (४५), गेंदलाल नैताम (४०), ईश्वर कुमरे (३५) तिघेही रा. कोटगूल अशी आरोपींची नावे आहेत. कोरची तालुक्यातील कोटगल जवळील कोहका वनकक्ष ३९८ च्या राखीव जंगलालगत शेतात विद्युत तार लावून श्यामलाल बोगा, बरन मडावी, गेंदलाल नैताम, ईश्वर कुमरे या चौघांनी १८ आॅक्टोबर रोजी मंगळवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास वीज ताराने फास लावून रानडुकराची शिकार केली. सदर माहिती कोटगूल पोलीस केंद्राला मिळताच त्यांनी ही माहिती मालेवाडाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना दिली. तत्काळ वनपरिक्षेत्राधिकारी डी. आर. कोरेवार, क्षेत्रसहाय्यक एम. ए. पठाण, व्ही. एम. तुमराम, वनरक्षक के. जे. कुमरे, लाकडे, उमरे, रामटेके, नाकाडे, चौधरी, कुमोटी, शेख, ठाकरे, कोथडे, साखरे, खोब्रागडे, राऊत, गोनाडे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व चारही आरोपींना रानडुकराच्या मांसासह अटक केली. आरोपींच्या विरोेधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८, ४९, ५० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बुधवारी कुरखेडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आले असता, न्यायालयाने सर्व चारही आरोपींना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)