शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यात उपचार घेणाऱ्या मुख्याध्यापिकेच्या मदतीला धावला माजी विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:16 IST

विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते हे गुरू-शिष्यासारखे असते. शाळेच्या चार भिंतीत शिस्त, संस्कार आणि पाठ्यक्रमाचे धडे घेणारे अनेक विद्यार्थी शाळा, ...

विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते हे गुरू-शिष्यासारखे असते. शाळेच्या चार भिंतीत शिस्त, संस्कार आणि पाठ्यक्रमाचे धडे घेणारे अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालय सोडल्यावरही हे नाते जपतात. याचा प्रत्यय आरमोरी येथील सारंग जांभुळे यांनी दिला. सन २०११ ते २०१६ दरम्यान ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद स्कूल येथे शिक्षण घेणाऱ्या सारंग जांभुळे यांच्या तत्कालीन प्राचार्य असलेल्या सिस्टर नव्या रोज मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथील जोसेफ हाॅस्पिटल येथे भरती आहेत. कोरोनामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन देणे गरजेचे होते; पण खूप प्रयत्न करूनही ते इंजेक्शन मिळत नव्हते; पण जांभुळे यांनी पूर्ण प्रयत्न केेले आणि त्यांना त्यात यश आले.

बाॅक्स

युकाॅच्या उपक्रमातून मदत

इंजेक्शनअभावी मुख्याध्यापिकेचा जीव धोक्यात आला आहे, ही बाब आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव सारंग नरेंद्र जांभुळे या माजी विद्यार्थ्याला कळताच त्यांनी मदतीसाठी हालचाली सुरू केल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक काँग्रेसतर्फे कोविडच्या काळात लोकांच्या मदतीसाठी सुरू केलेली एसओएसआयवायसी या उपक्रमाच्या माध्यमातून तेथील पदाधिकाऱ्यांचे नाव नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना विनंती करून मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मध्यप्रदेशमधील युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत पराशर यांनी दुसऱ्या दिवशी रेमडेसिविर इंजेक्शन सिस्टर नव्या रोज यांना उपलब्ध करून दिले.