शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदाराच्या काँग्रेस प्रवेशाचा मार्ग झाला सुकर

By admin | Updated: October 10, 2015 01:37 IST

अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याबाबत जिल्हास्तरावरील नेत्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या.

राऊत यांची शिष्टाई : दीपक आत्राम काँग्रेसी होणारगडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याबाबत जिल्हास्तरावरील नेत्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु माजी खासदार मारोतराव कोवासे यांचा या बाबीला काही मुद्यांवर आक्षेप होता. त्यामुळे दीपक आत्राम यांच्या काँग्रेस प्रवेशात अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर अहेरी उपविभागातील काही काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन आत्राम विरोधकांना पक्षात प्रवेश करवून आणला होता व वडेट्टीवारांच्या उपस्थितीत आलापल्ली येथे पक्षाचा मेळावाही घेण्यात आला होता. त्यामुळे दीपक आत्राम यांचा काँग्रेस प्रवेश होते किंवा नाही याविषयी सर्वसामान्य नागरिक व काँग्रेसमध्येच संभ्रमाची स्थिती होती. मात्र माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गडचिरोली जिल्हा निरिक्षक म्हणून या प्रकरणात लक्ष घालून माजी खासदार कोवासे यांच्याशी दीर्घ चर्चा केली. दीपक आत्राम यांच्या पक्ष प्रवेशामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात पक्ष मजबूत होईल. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा ही बाब लक्षात घेऊन माजी खासदार कोवासे यांचाही रोष शांत करण्यात राऊत यांना यश आले. त्यानंतर सर्व काँग्रेस नेत्यांनी दीपक आत्राम यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर आत्राम यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे संकेत नेत्यांनी दिले. नगर पंचायत निवडणुकीनंतर याबाबत प्रवेशाचा मुहूर्त निघेल. (प्रतिनिधी)