शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेवरील कर्ज माफ करा

By admin | Updated: April 22, 2017 01:21 IST

गडचिरोली नगर परिषदेने वाढीव पाणी पुरवठा योजनेकरीता घेतलेले कर्ज, त्यावरील व्याज, दंडनिय व्याज तसेच हमी शुल्क

गडचिरोली न.पं.ची सभा : सर्वसाधारण सभेत ठराव पारित गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेने वाढीव पाणी पुरवठा योजनेकरीता घेतलेले कर्ज, त्यावरील व्याज, दंडनिय व्याज तसेच हमी शुल्क नगर परिषदेच्या आर्थिक परिस्थितीमुळे भरणा करणे शक्य नाही. त्यामुळे सदर कर्ज माफ करण्यात यावे, अशा शिफारशीचा ठराव शुक्रवारी झालेल्या नगर पालिकेच्या सर्वधारण सभेत पारित करण्यात आला. हा ठराव राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी दिली. भारतीय जनता पार्टीची गडचिरोली पालिकेवर एकहाती सत्ता प्रस्तापित झाल्यानंतर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी त्यांच्या दालनात पार पडली. या सभेत जीवन प्राधिकरणास शहराच्या मल निस्सारण प्रकल्प व्यवस्थापकाला सल्लागार न करता खासगी सल्लागार कोकणे यांची व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय विविध ठराव पारित करण्यात आले. यावेळी सभेला न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, पाणी पुरवठा सभापती केशव निंबोळ, शिक्षण सभापती अ‍ॅड. नितीन उंदीरवाडे, स्वीकृत सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, नंदकिशोर काबरा, महिला व बाल कल्याण सभापती अल्का पोहणकर, मुख्याधिकारी कृष्णा निपाने, नगरसेवक सतीश विधाते, संजय मेश्राम, भुपेश कुळमेथे, प्रशांत खोब्रागडे, माधुरी खोब्रागडे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेत चंद्रपूर मार्गावरील नगर परिषदेच्या जुन्या कार्यालयाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय पे एन्ड यूज तत्वावर हस्तांतरीत करण्याची मंजुरी देण्यात आली. शहरात जिल्हा क्रीडा संकूल उभारण्यासाठी पालिकेची काहीच हरकत नसल्याचा ठराव पारित करण्यात आला. पालिका क्षेत्रातील नवीन वस्ती व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार नवीन वीज खांब उभारून त्यावर स्ट्रिट लाईट लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आगामी सत्र २०१७-१८ मध्ये शुज, सॉक्स व स्कुल बॅग खरेदी करून पुरवठा करण्याचा ठराव पारित करण्यात आला. याशिवाय शहरातील विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली.