शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

टीपी देण्यास वन विभागाची टाळाटाळ

By admin | Updated: July 5, 2017 01:17 IST

आष्टी परिसरातील धन्नूर, चौडमपल्ली, चपराळा, चंदनखेडी, रामनगट्टा, सिंगमपल्ली, ठाकरी, कुनघाडा, मार्र्कंडा, इल्लूर या गावातील नागरिकांनी यावर्षी स्वत:हून तेंदूपत्ता संकलन केले.

लाखोंचा तेंदूपत्ता पडून : चपराळा अभयारण्यांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांचा संघर्षलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी परिसरातील धन्नूर, चौडमपल्ली, चपराळा, चंदनखेडी, रामनगट्टा, सिंगमपल्ली, ठाकरी, कुनघाडा, मार्र्कंडा, इल्लूर या गावातील नागरिकांनी यावर्षी स्वत:हून तेंदूपत्ता संकलन केले. मात्र तेंदूपत्त्याच्या वाहतुकीसाठी वन विभागाने टीपी देण्यास नकार दिला असल्याने लाखो रूपयांचा तेंदूपत्ता गावातच पडून आहे. वन हक्क कायद्यानुसार धन्नूर, चौडमपल्ली, चपराळा, चंदनखेडी, रामनगट्टा, सिंगमपल्ली, ठाकरी, कुनघाडा, इल्लूर, मार्र्कंडा रै. या गावांना जमिनीचे पट्टे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर धन्नूर व चंदनखेडी या दोन गावाला ९० हेक्टरचा सामुहिक वनदावा मंजूर केला आहे. तसेच ही सर्व गावे पेसा कायद्यांतर्गत येत असल्याने वनोपज गोळा करून ती विक्री करण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. त्यानुसार या गावातील गावकऱ्यांनी यावर्षी तेंदू संकलन केले. त्यावेळी वन विभाग व गावकरी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. या ठिकाणी अभयारण्य असल्याचे कारण सांगून वन विभागाने तेंदूपत्ता संकलन करू देण्यास नकार दिला होता. आता टीपी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. गावकरी, जिल्हाधिकारी व वन विभागाचे अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत टीपी देण्याच्या सूचना केल्या. मात्र अजूनपर्यंत टीपी दिली नाही. त्यामुळे लाखो रूपयांचा तेंदूपत्ता खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धन्नूर येथे वीज पडून दीपक कुसनाके, आकाश कुसनाके, रमेश कुसनाके, लक्ष्मण तुरे, विलास आत्राम, लचमा कन्नाके, दिवाकर तलांडे हे जखमी झाले. मात्र शासनाने त्यांना किरकोळ मदत दिली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांची भेट घेतली असता, या दोन प्रमुख समस्या नागरिकांनी सांगितल्या. तेंदूपत्ता वाहतुकीसाठी टीपी द्यावी, अन्यथा काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, तालुका अध्यक्ष शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, किसन शेट्ये, संजय पंदिलवार, शंकर आकरेड्डीवार, दिलीप शेख, शंकर आत्राम, मोतीराम कुसनाके, तुकाराम शेडमाके, नामदेव कुसनाके, जानकीराम कुसनाके, वसंत तोरे, कालिदास कुसनाके, जयराम कन्नाके, सदाशिव पेंदाम, सखाराम पेंदाम, मानिक मडावी व गावकरी उपस्थित होते.