शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पाठविला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:00 IST

नागरिकांच्या आक्राेशाची दखल घेत वनविभागाने ड्राेन कॅमेरा तसेच ट्रॅप कॅमेऱ्याने नरभक्षक वाघाची ओळख पटविली आहे. या वाघाला जेरबंद करता यावे, यासाठी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला  परवानगी मिळावी, यासाठी वनविभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. परवानगी मिळताच वाघाला जेरबंद केले जाणार आहे. 

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : तालुक्यात धुमाकूळ घालून नागरिकांच्या नरडीचा घाेट घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने कडक पावले उचलली आहेत. त्या हल्लेखोर वाघाची ओळख पटली असल्याचा दावा करत त्याला जेरबंद करण्यासाठी परवानगी मिळावी असा प्रस्ताव वनसंरक्षक कार्यालयाने मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे पाठविला आहे. गडचिराेली तालुक्यातील भिकारमाैशी, आंबेशिवणी, आंबेटाेला, मुरमाडी, अमिर्झा, माैशिखांब, टेंभा, चांभार्डा, धुंडेशिवणी, राजगाटा चक, उसेगाव, जेप्रा, दिभना, गाेगाव, अडपल्ली, महादवाडी, कुऱ्हाडी, चुरचुरा, नवरगाव, आदी गावांमध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे. मागील दहा महिन्यांत ११ शेतकऱ्यांचा त्यात बळी गेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्या हल्लेखोर नरभक्षक वाघाचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी रेटून धरली आहे. त्यासाठी वनसंरक्षक कार्यालयासमाेर ठिय्या आंदाेलनही केले जात आहे. नागरिकांच्या आक्राेशाची दखल घेत वनविभागाने ड्राेन कॅमेरा तसेच ट्रॅप कॅमेऱ्याने नरभक्षक वाघाची ओळख पटविली आहे. या वाघाला जेरबंद करता यावे, यासाठी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला  परवानगी मिळावी, यासाठी वनविभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. परवानगी मिळताच वाघाला जेरबंद केले जाणार आहे. 

दुसऱ्याही दिवशी आंदाेलन सुरूचदरम्यान, वाघाला जेरबंद करावे यासाठी गडचिराेली तालुक्यातील गावांमधील नागरिक व भारतीय जनसंसदेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारपासून वनसंरक्षक कार्यालयासमाेर आंदाेलन सुरू केले. गुरुवारी दुसऱ्याही दिवशी आंदाेलन सुरूच हाेते. जाेपर्यंत वाघाला जेरबंद केले जात नाही, ताेपर्यंत आंदाेलन सुरूच ठेवण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. प्रत्येक गावचे नागरिक आळीपाळीने आंदाेलनात सहभागी हाेणार आहेत. 

ट्रॅप कॅमेऱ्याच्या मदतीने त्या हल्लेखोर वाघाची ओळख पटली आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी कार्यालयामार्फत पाठपुरावा सुरू आहे. मान्यता मिळताच वाघाला जेरबंद करण्यासाठी तत्काळ उपाययाेजना केली जाईल. - डाॅ. किशाेर मानकर, वनसंरक्षक, गडचिराेली

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग