शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सदस्यता नोंदणी अभियान जोमाने राबवा

By admin | Updated: November 30, 2014 23:05 IST

भारतीय जनता पार्टीला जगात क्रमांक १ चा पक्ष म्हणून स्थापित करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान प्रभाविपणे राबवा, असे आवाहन नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले यांनी केले.

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीला जगात क्रमांक १ चा पक्ष म्हणून स्थापित करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान प्रभाविपणे राबवा, असे आवाहन नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले यांनी केले. भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानांतर्गत शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे, पूर्व विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, भाजपा संघटन महामंत्री बाबुराव कोहळे, प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, सदानंद कुथे, प्रकाश सा. पोरेड्डीवार, नानाभाऊ नाकाडे, रवींद्र ओल्लालवार, दामोधर अरगेला, सुधाकर येनगंधलवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शालुताई दंडवते, देसाईगंजचे नगराध्यक्ष श्याम उईके, दिलीप सारडा, प्रकाश अर्जुनवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना खासदार अशोक नेते म्हणाले, पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यात किमान १ लाख सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन करून प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर किमान १०० सदस्य तयार करण्याचे आवाहन केले. डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी सदस्य नोंदणी अभियानाची माहिती देऊन मंडळ स्तरावर कार्यशाळा आयोजित करून अधिकाधिक कार्यकर्त्यांचा सहभाग नोंदणी अभियानात करण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यशाळेत आमदार क्रिष्णा गजबे यांनी कार्यकर्त्यांनी सदैव तत्पर राहावे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, संचालन जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत भृगुवार, आभार जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)