शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचे नियम पाळा

By admin | Updated: September 4, 2014 23:48 IST

वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहनावरील गती नियंत्रित ठेवल्यास कुठलाच अपघात होत नाही. जीवनाचे अमूल्य महत्व ध्यानात ठेवून सर्वांनी वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,

रस्ता सुरक्षा कार्यशाळा : वाहतूक पोलीस उपनिरीक्षकांचे आवाहनगडचिरोली : वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहनावरील गती नियंत्रित ठेवल्यास कुठलाच अपघात होत नाही. जीवनाचे अमूल्य महत्व ध्यानात ठेवून सर्वांनी वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन गडचिरोली पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी केले. रस्ता सुरक्षा दशकाच्या निमित्याने येथील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान मार्गदर्शन कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री होते. पुढे बोलतांना पोलीस उपनिरीक्षक कांबळे म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या युगातही नागरिकांनी जीवनाचे अमूल्य महत्व विसरू नये, एकदा गेलेले माणसाचे जीवन पुन्हा आयुष्यात परत मिळत नाही. त्यामुळे आयुष्याच्या वाटचालीत धोका होऊ नये म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले. प्राचार्य डी. जी. म्हशाखेत्री म्हणाले, कोणत्याही गोष्टीवरील नियंत्रणे हे अपघातापूर्वी करता येते. अपघातानंतर नियंत्रण शक्य नाही. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे काळाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. प्रास्ताविकेत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. जे. मेश्राम यांनी सध्याच्या युगात रस्ता सुरक्षा अभियानाचे नितांत गरज असल्याचे सांगितले. महाविद्यालयीन युवकांनी तसेच युवतींनी वाहन जपून चालवावे, जेणे करून धोका होणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. के. आर. भांडारकर यांनी केले तर आभार कुसराम यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. विलास खुणे, प्रा. जे. जी. उईके, प्रा. एम. के. नक्षीणे, प्रा. आर. एस. कोल्हे, प्रा. ठवरे, प्रा. सुरणकर, प्रा. पी. टी. सहारे आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. राकेश करोडकर व रासेयो स्वयंसेवकांनी सहकार्य केले.