शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गासाठी वडसात होणार उड्डाण पूल

By admin | Updated: March 7, 2016 01:00 IST

वर्षभरापूर्वी घोषित झालेल्या साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम होणार आहे.

साकोली-सिरोंचा मार्ग : बायपासचा मुद्दा संपुष्टातदेसाईगंज : वर्षभरापूर्वी घोषित झालेल्या साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सेतू भारतम् योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण योजनेत वडसा रेल्वे क्रॉसिंगचा समावेश करण्यात आला असल्याने देसाईगंज येथील बायपासचा मुद्दा पूर्णत: संपुष्टात आला आहे. त्यामुळे साकोली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गासाठी देसाईगंज येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाण पूल होणार आहे. सेतू भारतम् योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्गांना पुढील चार वर्षात रेल्वे क्रॉसिंगमुक्त करण्यात येणार आहे. यासाठी २०८ रेल्वे क्रॉसिंगची निवड करण्यात आली असून या ठिकाणी रेल्वे फाटक पूल बनविण्यात येणार आहे. या योजनेत महाराष्ट्र राज्यातील १२ मार्गावरील फ्लाईओवरचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. या उड्डाण पुलामुळे रेल्वे क्रॉसिंग मुक्त होणार आहे. गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील एकमेव वडसा रेल्वे स्टेशनचा सेतू भारतम् योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील देसाईगंज येथील बायपासचा मुद्दा संपुष्टात आला आहे. साकोली-देसाईगंज-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम पावसाळ्यासह तीन महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे. या मार्ग निर्मितीमुळे परिसरातील दळणवळण, उद्योगधंदे व विकासाला चालना मिळणार आहे. सदर राष्ट्रीय महामार्ग शहरी अथवा बायपास मार्गातून नेण्याबाबतचे दोन प्रस्ताव जनतेसमोर ठेवण्यात आले होते. सदर राष्ट्रीय महामार्गाची रूंदी २४.२४ मीटरची राहणार असल्याची माहिती यापूर्वी विभागामार्फत देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)