शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ज्योत आरमोरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:43 IST

आरमोरी येथील जुन्या बसस्थानक परिसरातील दुर्गा माता मंडपात पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातील ज्योत आणण्यात आली असून गुरूवारी दुपारी ३ वाजता या ज्योतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

ठळक मुद्देमंदिराची प्रतिकृती साकारली : ढोल-ताशांच्या गजरात गुरूवारी केली प्रतिष्ठापना

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी येथील जुन्या बसस्थानक परिसरातील दुर्गा माता मंडपात पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातील ज्योत आणण्यात आली असून गुरूवारी दुपारी ३ वाजता या ज्योतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.आरमोरी येथील दुर्गा उत्सव संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. देशभरातील प्रसिध्द धार्मिक ठिकाणांच्या या ठिकाणी प्रतिकृती तयार केल्या जातात. जुन्या बसस्थानकाजवळील दुर्गा माता मंडळांने यावर्षी महाराष्टÑातील प्रसिध्द देवस्थान पंढरपूरचा देखावा तयार केला आहे. ज्या ठिकाणचा देखावा असेल त्याच ठिकाणची ज्योत आणण्याची परंपरा जोपासली जात आहे. या अंतर्गत यावर्षी पंढरपूर येथील ज्योत विठ्ठल-रखुमाईच्या आणण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात गुरूवारी आरमोरी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविक सहभागी झाले होते.विठ्ठलाच्या दर्शनासाठी उसळणार गर्दीपंढरपूर येथील विठ्ठलाचे देवस्थान हे महाराष्टÑाचे आराध्यदैवत मानल्या जाते. आषाढी एकादशी व कार्तिक महिन्यात जिल्ह्यातील अनेक भाविक नित्यनेमाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. ज्यांना दरवर्षी जाण्याचे भाग्य लाभत नाही. असे नागरिक आयुष्यात किमान एकदा तरी विठ्ठलाचे दर्शन घेण्याची आस बाळगतात. मात्र आयुष्यात एकदाही पंढरपूरला न जाऊ शकणाºया भाविकाची आस अधुरी राहते. आरमोरी येथील दुर्गा उत्सव मंडळाने यावर्षी पंढरपूरचा देखावा निर्माण केला आहे. जे भाविक पंढरपूरला जाऊन प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकले नाही, अशा भाविकांची मनोकामना आरमोरी येथील विठ्ठलाचे प्रतिकात्मक मंदिर बघून पूर्ण होणार आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाविकांची गर्दी उसळणार आहे.