शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या महालक्ष्मीची ज्योत आरमोरीत

By admin | Updated: October 14, 2015 01:51 IST

या वर्षीच्या नवरात्र उत्सवात आरमोरी येथे कोल्हापूरच्या प्रसिद्ध धार्मिक स्थळ महालक्ष्मी ज्योत आणण्यात आली ....

४६ वर्षांची परंपरा : जुन्या बसस्थानक परिसरात स्थापनाआरमोरी : या वर्षीच्या नवरात्र उत्सवात आरमोरी येथे कोल्हापूरच्या प्रसिद्ध धार्मिक स्थळ महालक्ष्मी ज्योत आणण्यात आली असून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून सदर ज्योतीची जुन्या बसस्थानक वरील दुर्गा माता मंडपात मंगळवारी प्रतिस्थापना करण्यात आली.आरमोरी येथील दुर्गा उत्सव संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने तयार करण्यात येणारे धार्मिक स्थळाचे देखावे पाहण्यासाठी संपूर्ण विदभार्तील जनता आरमोरी येथे येतात. त्यामुळे दरदिवशी आरमोरी येथे हजारो भाविकांची गर्दी उसळते . या वर्षी दक्षिण भागातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी चे मंदिराचा देखावा असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह वाढला आहे . य दुर्गा उत्सवाच्या आनंदात जुन्या बसस्थानका जवळील नवदुर्गा मंडलाच्या दुर्गा माता मंडपात ठेवण्यात येणारी ज्योत आणखीनच भर घालते. विशेष म्हणजे सदर ज्योत भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळावरून आणण्यात येते .या वर्षी कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मंदिरातून ज्योत आणण्यात आली . ज्योतीचे आरमोरी येथे मंगळवारी सकाळी ९ वाजता आगमन झाले त्यानंतर जीवानी राईस मिल येथून ढोल, ताशे, दिंडी, गोंडीनृत्य व भजनाच्या गजरात मिरवणूक काढून सदर ज्योतीची जुन्या बसस्थानक परिसरातील दुर्गा मातेच्या मंडपात प्रतिस्थापना करण्यात आली, या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. सदर ज्योत नवरात्र भर प्रज्वलित ठेवली जाणार आहे. या ठिकाणी पहाटे ४ वाजेपासून भजन कीर्तन केले जाते. मागील ४६ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे.सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ज्योतप्रत्येक भाविक दूरच्या धार्मिक स्थळी जाऊन प्रत्यक्ष पूजाअर्चा करू शकत नाही , त्यामुळे त्या ठिकाणची ज्योत आणून तिची पूजाअर्चा केली जाते . या पूर्वी अमरनाथ, वैष्णवी देवी, सप्तश्रुंगी, पावागड येथील ज्योत आणण्यात आली. ही जोत आणण्यासाठी नवदुर्गा उत्सवात सहभागी असलेले सर्वधर्मियांचे सहकार्य लाभते. त्यामुळे हा सोहळा सर्व धर्मसमभावाचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे प्रज्वलित ज्योत हजारो किलोमीटरचे अंतर पार करीत आणणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे. मात्र हे काम नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी मागील अनेक वषार्पासून चांगल्या पद्धतीने पार करीत आहेत.