शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक प्रयोगशाळेचे पहिलेच रु ग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:30 IST

येथील इंदिरा गांधी चौकात उभारण्यात आलेले १०० खाटांचे जिल्हा महिला व बाल रुग्णालय जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील एक मैलाचा दगड ठरणार आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण झाले.

ठळक मुद्देतज्ज्ञ डॉक्टरांची चमू : महिला व बाल रुग्णालयातून चांगली सेवा मिळण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात उभारण्यात आलेले १०० खाटांचे जिल्हा महिला व बाल रुग्णालय जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील एक मैलाचा दगड ठरणार आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण झाले. सेंट्रल क्लिनिकल लेबॉरेटरीने सुसज्ज असे हे रुग्णालय राज्यातील पहिलेच महिला व बाल रुग्णालय असल्याचे सांगितले जात आहे.लोकार्पणानंतर मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी विविध सुविधांची पाहणी केली. येथे स्त्रियांच्या गर्भाशय कर्करोगाचे निदान करता येईल असे काल्पोस्कोपी हे यंत्र बसविण्यात आले आहे. यासोबत सिव्हेज ट्रीटमेन्ट प्लांट, सोलर वॉटर हिटर आणि रेन वॉटर हार्वेटिंग यंत्रणा असल्याने हे एक प्रकारे पर्यावरण अनुकूल असे ग्रीन हॉस्पिटल ठरले आहे.विदर्भ विकास कार्यक्र म २००९ अंतर्गत तत्कालीन पालकमंत्री आर.आर.पाटील यांच्या पुढाकाराने हे रुग्णालय मंजूर झाले होते. त्याचे भूमीपूजन ५ डिसेंबर २०१० रोजी त्यांच्याच हस्ते झाले होते. इमारतीचे एकूण बांधकाम ८४७१.९८ चौरस मीटर असून यासाठी १८ कोटी ७७ लक्ष ९ हजार रु पये खर्च आला आहे.या रु ग्णालयासाठी ६६ पदे मंजूर झालेली आहेत. यात एक अधीक्षकाचे पद असून एक स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ आहे. २ बधिरीकरण तज्ज्ञ, २ बालरोग तज्ज्ञ व एक क्ष-किरण तज्ज्ञ आहे. इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या ८ आहे. ६६ पैकी ५७ पदे कार्यरत आहेत. वर्ग ३ ची ५ आणि वर्ग ४ ची २४ पदे बाहय यंत्रणेमामार्फत भरण्यात येत आहेत.फायर फायटिंग सिस्टमसाठी ५० लाखांची मागणीजिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे डिझाईन बनविले त्यावेळी त्यात फायर फायटिंग सिस्टमची तरतूद नव्हती. पण अलिकडे झालेल्या काही आगीच्या घटनानंतर अशा मोठ्या इमारतींसाठी तशी आगरोधक यंत्रणा असणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यासाठी अतिरिक्त ५० लाख रुपयांची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आली आहे. तो निधी मिळताच इमारतीमध्ये तशी सुधारणा करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तुर्त इमारतीत ठिकठिकाणी अग्निशमन यंत्र लावण्यात आले आहेत.