शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर पहाडावर टाकली फायरलाईन

By admin | Updated: February 25, 2016 01:19 IST

वनपरिक्षेत्र दक्षिण धानोरा अंतर्गत दुधमाळा उपक्षेत्रातील मेंढा (लेखा), काकडयेली व महावाडा या तीन गावातील तब्बल १३०० लोकांनी एकत्र येऊन..

गावसीमा आखली : तीन गावातील १३०० लोकांचा पुढाकारगडचिरोली : वनपरिक्षेत्र दक्षिण धानोरा अंतर्गत दुधमाळा उपक्षेत्रातील मेंढा (लेखा), काकडयेली व महावाडा या तीन गावातील तब्बल १३०० लोकांनी एकत्र येऊन वन विभागाचे कर्मचारी व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या नेतृत्वात डोंगर पहाडावरील जंगल क्षेत्रात गावाची सीमा आखून फायरलाईन सोमवारी टाकली. जंगलाला आग लागून वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात नष्ट होते. तसेच वन्यप्राण्यांच्या जीवाला धोकाही निर्माण होतो. वणव्याचे यासह अनेक दुष्परिणाम दुधमाळाचे क्षेत्रसहायक जवाहरलाल गेडाम यांनी तिन्ही गावात सभा घेऊन लोकांना सांगितले. त्यानंतर मेंढा, काकडयेली, महावाडा या तिन्ही गावातील लोकांनी एकत्र येऊन सामूहिकरीत्या श्रमदानाने गावसीमा हद्दीची तोड व स्वच्छता करून जाड रेषा आखली. जमिनीपासून १२०० मीटर उंच असलेल्या डोंगर पहाडीवर चढून जंगलाच्या संरक्षणाची सीमा आखली. धानोरा वनपरिक्षेत्र दक्षिण कार्यालयामार्फत काकडयेली व मेंढा (लेखा) या वन संरक्षण समितीला वाईन्ड ब्लोअर मशिन देण्यात आली. या मशिनच्या सहाय्याने १३०० लोकांनी वणव्यास प्रतिबंधक जाड रेषा आखून वणव्यापासून या जंगलाचे संरक्षण करण्याचा संकल्प यावेळी केला. याप्रसंगी दक्षिण धानोराचे वनपरिक्षेत्राधिकारी इंद्रजीत विकम यांच्या मार्गदर्शनाखाली दुधमाळाचे क्षेत्रसहायक जवाहरलाल गेडाम, मेंढा (लेखा) चे वनरक्षक आर. एस. लांजेवार, महावाडाचे वनरक्षक नंदेश्वर यांच्यासह तिन्ही गावातील गावपाटील व नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)