शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी नगरपंचायतमध्ये अग्निशमन वाहन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:39 IST

चामोर्शी : येथील ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाला, मात्र शहरवासीयांची अनेक वर्षांपासून अग्निशमन वाहनाची मागणी पूर्ण होत नव्हती. नगरपंचायत प्रशासनाने ...

चामोर्शी : येथील ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाला, मात्र शहरवासीयांची अनेक वर्षांपासून अग्निशमन वाहनाची मागणी पूर्ण होत नव्हती. नगरपंचायत प्रशासनाने त्याची दखल घेतल्याने आता अग्निशमन वाहनही दाखल झाले आहे. ७२ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या या वाहनासाठी लवकरच मनुष्यबळही उपलब्ध केले जाणार आहे.

अग्निशमन सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात अग्निशमन वाहन खरेदी करण्यास मुंबईच्या अग्निशमन बोर्डाकडून १८ जून २०२० ला तांत्रिक मान्यता मिळाली होती. तर गडचिरोली जिल्हाधिकारी यांचेकडून २८ जानेवारी २०२१ ला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ७२ लाख ७२ हजारांची किंमत असलेल्या अग्निशमन वाहन खरेदीची निविदा मुंबईच्या निधी इंटरप्रायजेसला मिळाली होती.

नगर पंचायत मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी या वाहनासोबत नेमके किती कर्मचारी असणार हे निश्चित सांगता येणार नाही, परंतु डायरेक्टर ऑफिसकडून नगरपंचायतीला आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. तसेच आग्निशमन गाडी पुरवठा कंपनीचे इंजिनियर येऊन न.प. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देणार आहेत. सद्यस्थितीत न.प.चे जुने कर्मचारी देखभाल करतील असे ते म्हणाले.

(बॉक्स)

वेळ वाचून हानी टाळता येणार

या अग्निशमन वाहनाची क्षमता २५०० लिटर असून केमिकल फायबर, पेट्रोलियम फायर, आदी सर्व प्रकारच्या आगी विझविण्यासाठी हे वाहन उपयुक्त ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चामोर्शीकरांकडून अग्निशमनची सुविधा असावी अशी मागणी होती. नगरपंचायत प्रशासनाकडे अग्निशमन वाहन उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात आगीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी अडचण येत होती. आग लागल्यास गडचिरोली, मूल येथील अग्निशमन वाहन मागवावे लागत होते. मात्र तोपर्यंत वेळ निघून जात होती. आता या वाहनामुळे संभावित वित्त व जीवितहानी नियंत्रणात आणता येऊ शकते.

===Photopath===

260521\img-20210525-wa0127.jpg

===Caption===

चामोर्शि नगरपंचायत ला मध्ये अग्निशामक वाहन दाखल