शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीचे ठाणेदार व बीट जमादारावर गुन्हा दाखल करा

By admin | Updated: October 7, 2016 01:37 IST

आरमोरी तालुक्याच्या वैैरागड येथील शुभम राऊत व रूपेश राऊत यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार राजेश राऊत यांनी

पत्रपरिषद : शिवसेनेची मागणी; पीडित कुटुंबाचा उपोषणाचा इशारागडचिरोली : आरमोरी तालुक्याच्या वैैरागड येथील शुभम राऊत व रूपेश राऊत यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार राजेश राऊत यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी रूपेशचे नाव असताना रितेशला अटक केली. रितेशला न्यायालयातून जामिनावर सुटका करून घ्यावी लागली. वास्तविक राजेश राऊतने स्वत:वर जखमा करून व अंगावरील कपडे फाडून प्राणघातक हल्ला झाल्याचा देखावा केला होता तरी सुद्धा कुठलीही चौकशी न करता त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे आता ठाणेदार आणि बीट जमादारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हरिष मने व अन्यायग्रस्त कुटुंबाने आरमोरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. राजेश राऊत याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत रितेशचे नाव नसताना देखील तसेच मोका चौकशी न करता रितेशला अटक करण्यात आली व मागील दीड महिन्यापासून त्याला प्रत्येक सोमवारी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागले. त्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे अन्यायग्रस्त कुटुंबाने आपल्यावरील अन्यायाचे निराकरण व्हावे, ठाणेदार व बिट जमादारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली, अन्यथा कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा दिला. आरमोरी शहरात मोठ्या प्रमाणावर दारू, सट्टा, जुगार, कोंबडा बाजार आदी अवैैध धंदे दिवसाढवळ्या केले जात आहेत. अवैैध व्यावसायिकांना कोणाचाही धाक राहिला नाही. शहरात घरफोड्या वाढल्या असून पोलिसांनी अद्यापही एकाही गुन्हेगाराला पकडले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने पोलिसांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरिष मने यांनी पत्रकार परिषदेतून दिला. पत्रकार परिषदेला जि. प. सदस्य लक्ष्मी मने, पं. स. सदस्य नानू चुधरी, राजू अंबानी, प्रेमनाथ बेहरे, विजय खरवडे, कल्पना तिजारे, अन्यायग्रस्त राऊत कुटुंब रितेश राऊत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी कारवाई सुरू आहे. ज्या व्यक्तींनी आपल्यावर आरोप केले ते आरोप सूडबुद्धीने करण्यात आले आहेत. या प्रकरणात कारवाईतूनच पोलिसांची भूमिका स्पष्ट होईल. - महेश पाटील, ठाणेदार, आरमोरी