शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन पॅनलमध्ये काट्याची लढत

By admin | Updated: August 30, 2015 01:12 IST

१४ सप्टेंबर २०१५ रोजी होऊ घातलेल्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून १९ जागांपैकी चार जागांवर उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे.

चामोर्शी बाजार समिती निवडणूक : अतुल गण्यारपवार व भाजप समर्थित पॅनलमध्ये रस्सीखेचचामोर्शी : १४ सप्टेंबर २०१५ रोजी होऊ घातलेल्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून १९ जागांपैकी चार जागांवर उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. आता १५ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहे. यात बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार हे सेवा सहकारी गटामधून तर माजी सभापती दिवाकर कोलेट्टीवार हे ग्रामपंचायत मतदार संघातून रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीची चूरस प्रचंड वाढली आहे. सेवा सहकारी मतदार संघातील सर्वसाधारण गटातून सात उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी अतुल गण्यारपवार यांच्या शेतकरी सहकारी पॅनलचे अरूण बंडावार, अतुल गण्यारपवार, जानकीराम कुसनाके, परमानंद मलिक, सुधाकर निखाडे, गोसाई सातपुते, शंकर वंगावार हे उमेदवार मैदानात उतरले आहेत. शेतकरी सहकारी पॅनलच्या विरोधात भाजप समर्थित पॅनलचे बाबुराव बकाले, धर्मेंद्र दुबे, किरण कोवासे, तुकाराम तोरे, शिशीर पोद्दार, कैलाश सातपुते, फकीरा ठेंगणे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. याशीवाय यशवंत देवतळे, देवराव सिडाम अपक्ष म्हणून आपले भाग्य अजमावित आहेत. सेवा सहकारी संस्थेच्या मतदार संघातील महिला गटातून शेतकरी सहकारी पॅनलचे बैनाबाई मडावी, कौशल्या पोरटे तर भाजप समर्थीत पॅनलचे बेबीबाई भोयर व भानूमती रॉय उभ्या आहेत. इतर मागासवर्गीय गटासाठी शेतकरी सहकारी पॅनलचे विनायक आभारे तर भाजप समर्थित पॅनलचे सुधीर शिवणकर लढत आहेत. भटक्या जमाती, विमुक्त जाती गटातून शेतकरी सहकारी पॅनलचे गणपती भेंडारे तर भाजपा समर्थित यशवंत कलसार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अनिल केलावार हे अपक्ष उभे आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटातून शेतकरी सहकारी पॅनलचे रामचंद्र बामणकर, निकेश गद्देवार तर भाजप समर्थित पॅनलचे बंडू चिळंगे, शरदराव कोलेट्टीवार उभे ठाकले आहेत. याशिवाय विलास घोंगळे अपक्ष आहेत. आर्थिक दुर्बल गटातून शेतकरी सहकारी पॅनलचे सतिश रॉय तर भाजप समर्थित उमेश कुकडे उभे असून किशोर पोरटे अपक्ष आहेत. हमाल-मापारी व तोलारी मतदार संघातून शेतकरी सहकारी पॅनलचे विलास कुकडे तर त्यांच्या विरोधात अनिल नैताम तर संदीप राऊत उभे आहेत. अतुल गण्यारपवारच्या शेतकरी सहकारी पॅनलचे पणन प्रक्रिया मतदार संघातून अमोल गण्यारपवार, ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसूचित जाती/जमाती गटातून, बाजीराव गावडे अविरोध निवडून आल्यामुळे निवडणुकीपूर्वीच त्यांची सरशी झाल्याचे दिसते. याशिवाय व्यापारी व अडते मतदार संघातून चंद्रकांत दोषी व शामराव लटारे अविरोध निवडून आले असले तरी त्यांनी आपला कल व्यक्त केला नाही. निवडणूक निकालानंतर कोणत्या गटाला पाठींबा द्यायचा हे ते ठरविणार आहेत. चार जागी अविरोध निवड झाल्यामुळे होऊ घातलेल्या १५ जागांसाठी निवडणूक अटीतटीची होईल हे निश्चित. या निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी विजयासाठी कंबर कसली असून मागील पाच वर्षाच्या काळात बाजार समितीत विकास कामे झालेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झालेत, असा दावा करीत शेतकरी सहकारी पॅनल मैदानात आहे. (तालुका प्रतिनिधी)