शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

सेवाज्येष्ठतेत मराठीच्याच शिक्षकांचा भरणा

By admin | Updated: July 29, 2014 23:49 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नुकतीच सेवाज्येष्ठता यादी जाहीर केली असून या यादीमध्ये मराठी व सामाजिकशास्त्र विषयामध्ये पदवीधर व बीएड् झालेल्या शिक्षकांचाच भरणा आहे.

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नुकतीच सेवाज्येष्ठता यादी जाहीर केली असून या यादीमध्ये मराठी व सामाजिकशास्त्र विषयामध्ये पदवीधर व बीएड् झालेल्या शिक्षकांचाच भरणा आहे. त्यामुळे हे शिक्षक इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय शिकविणार कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी शिक्षण विभागाने पदोन्नतीस योग्य व पात्र अशा शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी जाहीर केली आहे. यामध्ये जवळपास ९५ टक्के शिक्षक मराठी व इतिहास, भुगोल, अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदवीधर आहेत. त्याचबरोबर बीएड्चे शिकविण्याचे विषयसुध्दा तेच आहेत. प्रत्येकच शाळेला सामाजिकशास्त्रांबरोबरच इंग्रजी, गणित व विज्ञान शिकविणाऱ्या शिक्षकांचीही आवश्यकता राहते. उलट हे विषय कठीण असल्याने या विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सेवाज्येष्ठता यादीमध्ये या शिक्षकांचे प्रमाण अत्यंत नगन्य आहेत. सामाजिकशास्त्रात शिक्षण घेतलेले शिक्षक विज्ञान, इंग्रजी, गणित हे विषय शिकवूच शकत नाही. केवळ याच विषयांमुळे विद्यार्थ्यांचा ओढा कॉन्व्हेंटकडे वाढला आहे. या शिक्षकांची नियुक्ती न केल्यास शिक्षणाचा दर्जाही घसरण्याची शक्यता आहे. परिणामी हे विषय शिकविण्यासाठी बीएड्धारक शिक्षक मिळत नसल्यास किमान एखादा शिक्षक पदवीधर असेल अशाचीही नियुक्ती करावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.