शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

आदिवासी विकास महामंडळ नाशिक अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय अहेरी मार्फत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्यावतीने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे धान खरेदी केंद्र सुरू

सिरोंचा : आदिवासी विकास महामंडळ नाशिक अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय अहेरी मार्फत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्यावतीने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर २७ डिसेंबरपर्यंत १ हजार ८१६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र केंद्रावर धान विक्रीसाठी नेलेले अनेक शेतकरी प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले.आदिवासी विकास महामंडळामार्फत शासनाच्या आधारभूत योजनेंतर्गत प्रती क्विंटल १ हजार ३६० हमी भावाने अंकिसा केंद्रावर २४ डिसेंबरपासून धान खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. आज मंगळवारला केंद्राला भेट दिली असता, आतापर्यंत १ हजार ८१६ क्विंटल धानाची खरेदी झाली असून या धानाच्या पोत्याची थप्पी लावण्याचे काम हमालामार्फत सुरू असल्याचे दिसून आले. अंकिसा येथील केंद्रावर असलेल्या एकमेव गोदामात जवळपास १ हजार क्विंटल धानाची साठवणूक करता येते. गोदामाअभावी उर्वरित धानाचे पोते खुल्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. धान विक्रीची रक्कम १५ ते २० दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यातच जमा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रतवारीक (ग्रेडर) मनोज धर्माजी इटनकर यांनी लोकमतच्या प्रतिनिधीला सांगितले. धानविक्रीची रक्कम नगदी मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची अडचण होत असल्याचे यावेळी स्पष्टपणे जाणवले. (शहर प्रतिनिधी)