शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

हातात जोडे घेत शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:35 IST

महावितरणच्या लहरीपणामुळे या परिसरातील रबी हंगामात धानाची लागवड करणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आंदोलनानंतर काही दिवस येथील वीज पुरवठा ...

महावितरणच्या लहरीपणामुळे या परिसरातील रबी हंगामात धानाची लागवड करणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आंदोलनानंतर काही दिवस येथील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात येतो. मात्र, परत १६ तासांचे लोडशेडिंग सुरू करण्यात येत असल्याने या परिसरातील धान पीक करण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच आमदार कृष्णा गजबे यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुरेन्द्रसिंह चंदेल, काँग्रेस नेते जीवन नाट, व्यंकटी नागीलवार यांनी मुंबई येथे पालकमंत्री, ऊर्जामंत्री तसेच महावितरणचे संचालक विजय सिंघल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. त्यांनी लोडशेडिंगला ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचेही मान्य केले. तरीसुद्धा येथील लोडशेडिंग १६ तास सुरूच असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर धडक दिली.

या आंदोलनात माजी नगराध्यक्ष डॉ. महेन्द्रकुमार मोहबंसी, माजी शिवसेना तालुका प्रमुख आशिष काळे, नगरसेवक पुंडलिक देशमुख, गुणवंत कवाडकर, राकेश खुणे, जयदेव खुणे, वासुदेव बहेटवार, पुरुषोत्तम तिरगम, अनिल उईके, जांभूळखेड्याच्या सरपंच राजबत्ती नैताम, उपसरपंच गणपत बन्सोड, दिगांबर नाकाडे, अशोक गायकवाड, जगदीश मानकर व अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

(बॉक्स)

बिल भरल्यास १६ तास पुरवठा

चोख पोलीस बंदोबस्तात उपविभागीय अभियंता मुरकुटे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी विद्युत बिलाची थकीत रक्कम काही प्रमाणात भरावी, यानंतर दिवसातून किमान १६ तास नियमित विद्युत पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले.