शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
2
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
3
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
4
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
5
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
6
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
7
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
8
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
9
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
10
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
11
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
12
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
13
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
15
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
16
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
17
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
18
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
19
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
20
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले

शेतकरी वळताहेत कुक्कुटपालनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:38 IST

अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गाई व बैल आहेत. ...

अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गाई व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना त्रास होत आहे. शेतकरी आता कुक्कुटपालनाकडे वळत आहे.

पक्षी शिकारीत वाढ

कुरखेडा : पाणीटंचाई जाणवू लागत असल्याने पक्षी गावालगत तलावात पाणी पिण्याकरिता येतात. अशावेळी काही नागरिक रात्रीच्या सुमारास जाळाच्या साहाय्याने झाडावरील पक्षी पकडत आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मोहफुलाच्या दारूची विक्री जोरात

गडचिरोली : जंगलात विविध भागात मोहफुलाची दारू काढण्याचा धंदा जोरात सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मोहफुलाची दारू काढून ती गावागावांत पोहोचविली जात आहे.

पर्यटनस्थळ दुर्लक्षित

कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटनस्थळे आहेत. कुरखेडा तालुक्यातील पर्यटनस्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे या स्थळांचा विकास करण्याची मागणी आहे.

प्रसूतीगृह नावापुरतेच

आरमोरी : जिल्ह्यातील ३७६ आरोग्य केंद्रांपैकी ३५४ उपकेंद्रांमध्ये प्रसूतीगृह बांधण्यात आले आहेत. मात्र, हे प्रसूतीगृह अत्यंत लहान असून या प्रसूतीगृहांमध्ये आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याने गरोदर मातांना त्रास हाेत आहे.

मुद्रा कर्जाचा लाभ नाही

काेरची : बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्यासाठी मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रावर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र, या योजनेंतर्गत कर्ज देण्यास जिल्ह्यातील अनेक बँका चालढकल करीत आहेत.

खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा

गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अल्पवयीनांवर कारवाई करा

देसाईगंज : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

हेमाडपंथी शिव मंदिर जीर्णावस्थेत

गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते.

पर्जन्यमापक वास्तूची दुरुस्ती करा

सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. नदीच्या काठावर असलेल्या सिरोंचा शहराला इंग्रजाच्या कालावधीपासून महत्त्व आहे.

डास व किटकांपासून आरोग्य धोक्यात

गडचिरोली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व किटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील नाल्या तसेच डबक्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी आहे.

वनहक्क प्रकरणे रखडली

सिरोंचा : वनहक्क कायद्यानुसार वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून वनहक्क प्रदान केला जातो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना अजूनही वनपट्टे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे नागरिक कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत.

राजोलीत अर्धवट पुलावरून प्रवास

धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.

कुरखेडा येथे पार्किंगची व्यवस्था करा

कुरखेडा : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.

पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाट वाढ

आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. पशुखाद्यांच्या किमती जवळपास १० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

कोरची विश्रामगृहाची मागणी प्रलंबितच

कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. या विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे. या ठिकाणी विश्रामगृह बांधल्यास या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सोयीचे होणार आहे.

रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर सुरूच

गडचिरोली : ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना काम मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर कामासाठी छत्तीसगड व तेलंगणा राज्यात स्थलांतर करत आहेत. हे मजूर तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू होईपर्यंत परतणार नाहीत. गोदावरी नदीवर पूल झाल्याने तेलंगणात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे.

भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे; परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली आदी गावे येतात.

अंकिसात स्वच्छतेकडे ग्रा.पं.चे दुर्लक्ष

अंकिसा : शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर यासाठी जनजागृती केली जात आहे; परंतु अंकिसा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला सर्वत्र प्लास्टिक, कचरा, काचेच्या बाटल्या व अन्य कचरा दिसून येतो.

टिल्लूपंप लावणारे कारवाईपासून दूर

गडचिरोली : शहरातील अनेक वॉर्डात टिल्लूपंप लावून अवैधरीत्या पाणी ओढले जात आहे. परिणामी अनेक वॉर्डातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नळांना केवळ पाच ते सहा गुंड पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. नळाला पाणी आल्यानंतर अनेक नागरिक छुप्या पद्धतीने लावलेला टिल्लूपंप सुरू करतात.

डास निर्मूलनासाठी धुरळणी करा

धानोरा : अनेक वर्षांपासून धुरळणी झाली नाही. वाढणाऱ्या डासांच्या पैदासीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुरळणी करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे. मात्र, नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालय सक्ती करा

आलापल्ली : ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश वीज कर्मचारी मुख्यालयी न राहता गडचिरोली, चामोर्शी येथे राहून ये-जा करतात. रात्रीच्या सुमारास बिघाड निर्माण झाल्यास हा बिघाड दुरुस्त करणे शक्य होत नाही.

वाहनांच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवा

चामोर्शी : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. अशा वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अनेक गावे विहिरीच्या पाण्यावर अवलंबून

आलापल्ली : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. एकूण लोकसंख्येच्या केवळ १९.५० लोकसंख्याच नळाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. उर्वरित जनतेला विहीर, हातपंपांच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. ग्रामपंचायतीच्यावतीने नियमितपणे विहीर व हातपंपांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकले जात नाही. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य राहत नसल्याचे आढळून आले आहे.