शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी बोनसच्या रकमेपासून वंचित

By admin | Updated: April 12, 2017 01:09 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत केंद्रांवर धानाची विक्री केलेल्या ...

शेतकरी अडचणीत : आदिवासी विकास महामंडळाचा भोंगळ कारभारदेसाईगंज : आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत केंद्रांवर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रूपये बोनस देण्याचे महामंडळाने जाहीर केले. ३१ मार्च २०१७ पूर्वी धानाची विक्री करूनही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही. देसाईगंज, कुरखेडा, कोरची, आरमोरी तालुक्यातील धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी जानेवारी, फेब्रवारी महिन्यात सहकारी संस्थांच्या केंद्रांवर धानाची विक्री केली मात्र अद्यापही त्या शेतकऱ्यांना धानावर मिळणारी बोनसची रक्कम प्राप्त झाली नाही. आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत धान विक्री केल्यास खाजगी धान खरेदीदारांपेक्षा जादाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत असते. मात्र धानाची विक्री रक्कम मिळण्यास उशीर होत असला तरी जादाची रक्कम बोनसच्या स्वरूपात मिळणार या उद्देशाने शेतकरी वर्ग या आधारभूत धानविक्री केंद्रावर धान विकत असतात.शेतकऱ्यांना याचा फायदा मिळावा यासाठी शासनाने महामंडळा अंतर्गत प्रती क्विंटल २०० रूपये शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी म्हणून बोनस जाहीर केल; मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. पिकांसाठी बँकेतून मिळणाऱ्या पीक कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करायचा असतो. या कालावधीत कर्जाची परतफेड न केल्यास पुढील वर्षी कर्ज मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी येतात. शेतीच्या भरवशावर जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची हक्काची रक्कम मिळत नसेल तर त्यानी कर्जाची परतफेड कशी करावी, असा आर्त सवाल शेतकरी करीत आहेत. पगारदार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लावण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. मात्र त्याच राज्यात शेतकऱ्यांना जाहीर केलेली बोनस रक्कम मिळण्यास अडचणी येत आहेत. (वार्ताहर)