शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

देसाईगंज : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला असताना शहरात व तालुक्यात शासनाच्या मार्गदर्शक ...

देसाईगंज : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला असताना शहरात व तालुक्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करताना दिसून येत नाही. सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याने शहरात ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

व्यापारीदृष्ट्या देसाईगंज शहर हे तालुक्यातील अति महत्त्वाचे शहर आहे. तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यातील नागरिक खरेदी, विक्रीच्या संबंधाने देसाईगंज शहरात अवागमन करीत आहेत. सध्या सर्वच व्यापार उद्दीम ज्या ठिकाणाहून चालओ. ते नागपूर शहर हे कोरोनाचे हॉटस्पाॅट ठरलेले आहे. दररोज त्या ठिकाणाहून भाजीपालापासून अनेक ट्रान्सपोर्टने माल देसाईगंजात पोहोचत आहे. शहरातील मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, गुजरी बाजार, बसस्टॉप परिसर या ठिकाणी विद्यार्थीवर्गापासून, तर आबाल वृद्धापर्यंत तोबा गर्दी होताना दिसून येत आहे. विशेष बाब अशी की, या कालावधीत एखाद्याची मयत झाल्यासही २० पेक्षा अधिक नागरिकांना अंत्यविधीला उपस्थित राहता येणार नाही. लग्न संभारंभात ५० पेक्षा अधिक नागरिकांना भाग घेता येणार नाही. मास्कचा वापर केल्याशिवाय दुकानात प्रवेश घेता येणार नाही. खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अनिवार्य केले आहे. मात्र, देसाईगंज तालुक्यात नियम धाब्यावर बसवत लग्नकार्य, सामूहीक भोजनाचे कार्यक्रम, अंत्यविधीला शेकडो नागरिकांची उपस्थिती हे प्रकार सुरु आहेत. प्रशासकीय यंत्रणा मूग गिळून हे सगळे बघत आहे. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाला मार्गदर्शक नियमावली देऊनही त्याची अमलबजावणी होताना दिसत नाही. नागरिक नियमांना बगल देत स्वैरपणे वागत असल्याने शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.