शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

६८ वाहनचालकांची नेत्र तपासणी

By admin | Updated: January 19, 2017 02:00 IST

डॉ. अप्पलवार आय हॉस्पिटल, राज्य परिवहन विभाग तसेच उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने

आॅटोरिक्षा चालकांना मार्गदर्शन : उपप्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम गडचिरोली : डॉ. अप्पलवार आय हॉस्पिटल, राज्य परिवहन विभाग तसेच उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी डॉ. अप्पलवार आय हॉस्पिटलमध्ये ६८ आॅटोरिक्षा चालक, टॅक्सीचालक व बसचालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. डॉ. हेमंत अप्पलवार व डॉ. अद्वय अप्पलवार यांनी चालकांची नेत्र तपासणी केली. यावेळी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, मोटारवाहन निरीक्षक नीलेश बन्सोडे, विलास अहेर, सहायक मोटार वाहन निरीक्षक दिनेश पाटील, गडचिरोली आगाराचे वाहतूक निरीक्षक बंडू तिलगामे, किशोर लिंगलवार, आॅटोरिक्षा युनियनचे अध्यक्ष मनोज आत्राम, टॅक्सी युनियनचे अध्यक्ष वैरागडे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. हेमंत अप्पलवार म्हणाले, वाहनचालकांची दृष्टी योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने नियमितपणे डोळ्यांची तपासणी करावी, आवश्यक असल्यास वाहन चालविताना चष्म्याचा वापर करावा, ज्या चालकाला चष्मा लागला आहे, अशा वाहनचालकाने चष्म्याशिवाय कधीही वाहन चालवू नये. दृष्टी जास्त दिवस टिकण्यासाठी डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन केले. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक वाहकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, मानसिक तणावात असताना वाहन चालवू नये, असे मार्गदर्शन केले. (नगर प्रतिनिधी)