लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्याच्या तळोधी (मो.) व हिवरगाव येथील अनेक हेक्टर क्षेत्रावरील धान पिकावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. सदर रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकºयांनी तब्बल १० वेळा कीटकनाशकाची फवारणी केली. मात्र पिकांवरील हा रोग आटोक्यात आला नाही. परिणामी शेतकºयांचे धान पीक पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे या भागातील शेतकºयांवर मोठे संकट ओढावले आहे.हिवरगाव येथील शेतकरी रमेश बारसागडे यांच्या साडेपाच एकर जागेवरील धान पीक तुडतुडा रोगाने नष्ट झाले. तसेच तळोधी येथील शेतकरी मारोती बारसागडे यांचेही धान पीक हातून गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले.कृषी विभागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असल्याची माहिती दिली जात आहे. मात्र या भागात कृषी विभागाचा एकही कर्मचारी सर्वेक्षणासाठी फिरकला नाही. त्यामुळे शेतकरी दुर्लक्षित आहे.
महागडी कीटकनाशके निरूपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 22:06 IST
चामोर्शी तालुक्याच्या तळोधी (मो.) व हिवरगाव येथील अनेक हेक्टर क्षेत्रावरील धान पिकावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. सदर रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकºयांनी तब्बल १० वेळा कीटकनाशकाची फवारणी केली.
महागडी कीटकनाशके निरूपयोगी
ठळक मुद्देसर्वेक्षणाचा पत्ता नाही : हिवरगाव-तळोधी परिसरातील पीक फस्त