शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चालविताना प्रत्येकांनी विशेष दक्षता बाळगावी!

By admin | Updated: January 18, 2017 01:46 IST

सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवित असताना काही विशिष्ट ठिकाणी प्रत्येक वाहनचालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे,

फासे यांचे प्रतिपादन : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चित्र प्रदर्शनी गडचिरोली : सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवित असताना काही विशिष्ट ठिकाणी प्रत्येक वाहनचालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे, अशी दक्षता घेतल्यास अपघाताचा धोका टाळता येतो, असे प्रतिपादन गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. पी. फासे यांनी केले. रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान मंगळवारी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चित्रप्रदर्शनी व रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य के. एस. विसाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून मोटर वाहन निरीक्षक एन. जी. बन्सोडे, गटनिदेशक वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य विसाळे वाहन निरीक्षक बनसोडे व गटनिदेशक वाळके यांनी वाहतुकीच्या नियमांबाबत मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. आर. बोढेकर यांनी केले तर संचालन भाष्कर मेश्राम यांनी केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी) वाहनचालकांनो, अशी घ्या काळजीवाहनचालकांनी वळणावर हॉर्न वाजवून इशारा द्यावा, वाहनाचा वेग कमी करावा, समोरील वाहनाला शक्यतोवर ओव्हरटेक करू नये, आपले वाहन धोकादायक स्थितीत चालवू नये, फुटब्रेक, हँडब्रेकचा योग्य वापर करावा, आपली वाहन नेहमी डाव्या बाजूस ठेवावे. बसस्टॉपजवळ बस थांबली असल्यास तेथील प्रवाशी खाली उतरेपर्यंत आपल्या वाहनाचा वेग कमी करावा, बस जाईपर्यंत आपले वाहन थांबवावे. रस्त्याच्या कडेला शाळा असलेल्या ठिकाणी विद्यार्थी ये-जा करीत असल्याने वाहनाचा वेग कमी करावा, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, रात्री वाहन चालविताना वेग नियंत्रित ठेवावा. अशा प्रकारची खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरटीओ फासे यांनी केले.