शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अवैध होर्डिंग्ज कायम

By admin | Updated: November 27, 2014 23:33 IST

शहरात असलेले अवैध होर्डिंग्ज काढण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका व नगर परिषद बरखास्त करण्याचे राज्य शासनाला आदेश देऊ, असा इशारा सोमवारी उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही

गडचिरोली : शहरात असलेले अवैध होर्डिंग्ज काढण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका व नगर परिषद बरखास्त करण्याचे राज्य शासनाला आदेश देऊ, असा इशारा सोमवारी उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही गडचिरोली नगर परिषदेने होर्डिंग्ज काढण्याची मोहीम अत्यंत संथगतीने सुरू ठेवली असून चार दिवसात केवळ दोन होर्डिंग्ज काढण्याची कारवाई पार पाडण्यात आली. शहरातील दुकान त्याचबरोबर एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्याच्या उद्देशाने शहरात चारही मुख्यमार्गावर अनेक होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. निवडणुकीच्या कालावधीत होर्डिंग्जमध्ये आणखी भर पडते. यामुळे शहराचे सौंदर्य धोक्यात येत असून वाहनचालकाला पुढचे दिसत नसल्याने अपघातही होण्याचे प्रमाण वाढले आहे. हीच परिस्थिती गडचिरोलीसह राज्यातील प्रत्येक शहरात आहे. यामुळे त्रस्त झालेल्या एका नागरिकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करताना १० दिवसांच्या आत नगर पालिका व महानगर पालिका क्षेत्रातील अवैध होर्डिंग्ज काढण्याचे निर्देश दिले. गडचिरोली नगर परिषद प्रशासन मात्र होर्डिंग्ज काढण्याचे काम अतिशय संथगतीने करीत असल्याचे दिसून येते. उच्च न्यायालयाने आदेश देऊन चार दिवसांचा कालावधी लोटला असला तरी केवळ दोन होर्डिंग्ज काढले आहेत. प्रत्यक्षात शहरात खासगी कंपन्यांचे व दुकानदारांचे अनेक होर्डिंग्ज दिसून येतात.शहरात होर्डिंग्ज लावण्यासाठी नगर परिषद प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी घेतल्यास रितसर पालिका प्रशासनाकडे काही प्रमाणात शुल्क भरावा लागते. तर दुसरीकडे विनापरवानगीनेही होर्डिंग्ज उभारल्यास नगर पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे बहुतांश नागरिक परवानगी न घेताच होर्डिंग्ज उभारतात. लावलेले होर्डिंग्ज कित्येक महिने कायम ठेवले जातात. मात्र नगर परिषद त्यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नाही. किमान उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तरी पालन करीत होर्डिंग्ज काढावे, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)