शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात मदत कक्ष व संपर्क सेतू केंद्राची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:35 IST

आरमोरी : साथी संस्था पुणे व आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात ...

आरमोरी : साथी संस्था पुणे व आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात मदत कक्ष व संपर्क सेतू केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. संपर्क सेतू व मदत कक्षामुळे उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयातील उपलब्ध सोयी-सुविधांची माहिती देणे व आरोग्य मिळवून देण्यास सहकार्य मिळणार आहे.

गरोदर मातांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ, जननी सुरक्षा योजनेस पात्र असणाऱ्या स्तनदा मातेस लाभ मिळण्यास अडचण आल्यास ती अडचण सोडविण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी महिलांना मिळणाऱ्या मातृत्व अनुदान योजनेकरिता सहकार्य करण्यात येणार आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णास कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराविषयी शास्त्रीय माहिती देऊन कोरोनाविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. गंभीर रुग्णांना संदर्भसेवा उपलब्ध करून देणे, ज्या रुग्णास शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य मित्राच्या सहकार्याने महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. तसेच तालुक्यातील वडधा, वैरागड, देलनवाडी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३० गावांत कोविड-१९ बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

मदत कक्ष व संपर्क सेतू केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेच्या सी. ए. एच. प्रकल्पाच्या जिल्हा समन्वयक शुभदा देशमुख, जिल्हा व्यवस्थापक विजयालक्ष्मी वघारे, तालुका समन्वयक पुष्पलता तिरपुडे, केंद्र समन्वयक गुरुदेव बांडे, दिव्यांग विदर्भ संघटनेच्या कोषाध्यक्ष निशा जांभुळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. छाया उईके, डॉ. मनोज धात्रक, डॉ. कावळे, डॉ. खान, आदी उपस्थित होते.

===Photopath===

230521\img-20210522-wa0042.jpg

===Caption===

आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात मदत कक्ष व संपर्क सेतु केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित शुभदा2देशमुख