शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नाट्य मंडळांची एन्ट्री

By admin | Updated: October 20, 2016 02:37 IST

झाडीपट्टी रंगभूूमीवर यंदा अनेक नव्या नाट्य मंडळांनी एन्ट्री केली असून जुने व नवे सारेच मंडळ लोककलेतून रसिकांचे प्रबोधन व मनोरंजन करण्यासाठी तयार झाले आहेत.

झाडीपट्टी रंगभूमी विस्तारली : यंदा प्रथमच महामंडळाची स्थापनाप्रदीप बोडणे  वैरागडझाडीपट्टी रंगभूूमीवर यंदा अनेक नव्या नाट्य मंडळांनी एन्ट्री केली असून जुने व नवे सारेच मंडळ लोककलेतून रसिकांचे प्रबोधन व मनोरंजन करण्यासाठी तयार झाले आहेत. झाडीपट्टी रंगभूमीतील कलाकारांच्या सन्मानासाठी व आचारसंहितेसाठी यंदा प्रथमच अखील झाडीपट्टी नाट्य महामंडळ देसाईगंजची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाशी संलग्नीत सर्व नाट्य मंडळाच्या कलाकारांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.झाडीत जन्माला आली म्हणूून झाडीपट्टीची रंगभूमी. भारूड, लावणी, तमाशा, दंडार या लोककला प्रकारातून जन्माला आलेली रंगभूमी पुढे बहरत गेली. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) हे आता झाडीपट्टी रंगभूमीचे केंद्र बनले असून तब्बल ४० नाट्य मंडळे यंदा नाट्य प्रयोग सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दीपावलीनंतर दिवसा मंडई व रात्री मनोरंजनासाठी नाटकांची पर्वणी सुरू होणार आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाट्य रसिक आहेत. स्वत:ची पदरमोड करून येथील रसिकांनी नाट्यप्रयोगाचा आस्वाद घेण्याचे वेड कायम जोपासले आहे. नाट्यप्रयोगाची तारीख निश्चित करण्यासाठी विविध गावातील आयोजक मंडळी वडसा शहर गाठत आहेत. अनेक मंडळांनी झाडीपट्टी नाट्यप्रयोगाची तारीख निश्चित केली आहे. पूर्वी बोटावर मोजण्याइतकी नाट्य मंडळे होती. सद्य:स्थितीत वडसा येथील झाडीपट्टी रंगभूमी केंद्रात ४० नाट्य मंडळे तयार झाले आहेत. आपल्या मंडळाकडून नाट्यप्रयोग देण्यासाठी वडसा येथे आपले कार्यालय उघडून बसले आहेत. आपली कला नाट्य रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी संगीतसाथ, रंग व वेशभूषा, ध्वनी व प्रकाश या सर्वांच्या माध्यमातून झाडीपट्टीची रंगभूमी एक हजार लोकांना रोजगार देत आहे. हिरव्याकंच झाडीतून या रंगभूमीने स्वत:ची स्वतंत्र वाट निर्माण केली. येथील जुन्या, जाणत्या अभिनय संपन्न नाट्यकर्मीने ऐतिहासिक, सामाजिक, संगीत, नाटकाच्या माध्यमातून रसिक मनावर राज्य केले. मात्र रंगभूमीची ही दिमाखदार वाट शहरीकरणाच्या महामार्गाला जोडल्यानंतर येथील हौशी रंगभूमीची व्यावसायिक रंगभूमी झाली. पुणे, मुंबईच्या कलाकारांचा ओढा या रंगभूमीवर वाढला आहे तर दुसरीकडे मातीतल्या कलाकारांना आपल्या अंगी असलेला अभिनय सादर करण्याची संधी न मिळाल्याने अलिकडे अस्सल झाडीचे कलाकार तयार झाले नाही.या रंगभूमीत प्रवेश करणाऱ्या नाट्य मंडळांनी येथील कलाकारांना संधी देऊन सदर रंगभूमीला जुने वैभव प्राप्त करून द्यावे, अशी नाट्य रसिकांची इच्छा आहे.महामंडळात १४ जणांचा सहभागझाडीपट्टीच्या नाट्य कलाकारांची आचारसंहिता ठरविण्याकरिता अखिल झाडीपट्टी नाट्य महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी यशवंत ढोरे तर सचिवपदी प्रल्हाद मेश्राम, कोषाध्यक्षपदी नित्यानंद बुद्धे यांची निवड करण्यात आली आहे. या महामंडळात जयप्रकाश बावनथडे, हिरालाल सहारे, किरपाल सयाम, नितीन नाकाडे, वासुकुमार मेश्राम, अशोक दुधकुवर, चेतन वडगाये, संजीव रामटेके, मुकेश गेडाम, श्यामराव खुणे, प्रदीप उके, प्रमोद नेवारे, सुशील कोडापे आदींसह एकूण १४ जणांचा समावेश आहे.