शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

संपाने महसूल प्रशासनाचे काम ठप्प

By admin | Updated: August 3, 2014 23:23 IST

आपल्या मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी १ आॅगस्टपासून बेमूदत संप सुरू केला आहे. यामुळे महसूल प्रशासनाचे काम ठप्प पडले आहे. याचा फटका विशेष करून शेतकरी व विद्यार्थ्यांना बसत आहे.

गडचिरोली : आपल्या मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी १ आॅगस्टपासून बेमूदत संप सुरू केला आहे. यामुळे महसूल प्रशासनाचे काम ठप्प पडले आहे. याचा फटका विशेष करून शेतकरी व विद्यार्थ्यांना बसत आहे. नायब तहसिलदारांचे गे्रड वेतन वाढविण्यात यावे, कनिष्ठ लिपिकाचे पदनाम महसूल सहकाय्यक असे करण्यात यावे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास नोकरी देण्यात यावी, अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रियेतची टक्केवारी वाढविण्यात यावी, नायब तहसिलदारांची सर्व पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, कोतवालांना चतुर्थ श्रेणीची वेतन श्रेणी लागू करावी आदी मागण्यांसाठी महसूल विभागाचे नायब तहसिलदार, अव्वल कारकुन, लिपिक , वाहन चालक, शिपाई या संवर्गातील कर्मचारी १ आॅगस्टपासून संपावर गेले आहेत. संपाचा आजचा तीसरा दिवस आहे. सर्वच कर्मचारी संपावर गेल्याने तहसील कार्यालयाचे काम ठप्प पडले आहेत. बेमुदत संपावर जाण्यापूर्वी महसूल कर्मचाऱ्यांनी या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून निर्दशने केली होती. धरणे व लेखणीबंद आंदोलन केल्यानंतरही शासनाने मागण्यांसंदर्भात साधी चर्चासुध्दा संघटनेसोबत केली नाही. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविषयी तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. मागण्या निकाली काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार महसूल कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी लांबणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. प्रत्येक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर शेतीची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना कर्ज घेण्याबरोबरच विविध प्रकारचे दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात जावे लागते. मात्र या कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. गडचिरोली येथील आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे सल्लागार एच. ए. पठाण, अध्यक्ष एस. के. बावणे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना गडचिरोलीचे अध्यक्ष एस. के. चडगुलवार, सरचिटणीस व्ही. एम. सवरंगपते, लतीफ पठाण, येरमे, कविता नायडू, धात्रक आदींनी सहभाग घेतला होता.