शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथ दुकानदारांनी काढले अतिक्रमण

By admin | Updated: January 7, 2017 01:23 IST

गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चार राष्ट्रीय महामार्गाच्या लगत इंदिरा गांधी चौकात असलेले

 पालिकेची धडक मोहीम सुरू : राष्ट्रीय महामार्गालगत इंदिरा गांधी चौकात कारवाई प्रारंभ होताच गडचिरोली : गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चार राष्ट्रीय महामार्गाच्या लगत इंदिरा गांधी चौकात असलेले फुटपाथ व्यावसायिकांचे अतिक्रमण शुक्रवारी नगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने चोख पोलीस बंदोबस्तात काढण्यास सुरूवात करताच चारही मार्गावरील व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण काढून टाकण्यास स्वत: सुरूवात केली. इंदिरा गांधी चौकातून या मोहिमेला प्रारंभ झाला. चंद्रपूर, धानोरा, आरमोरी व चामोर्शी या चारही मार्गावरील सर्व दुकानांचे अतिक्रमण काढण्याबाबत ३० डिसेंबर रोजी ४०० दुकानदारांना नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी ६ जानेवारीला नगर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरूवात करण्यात आली. यावेळी ५० वर अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. जेसीबीच्या सहाय्याने अनेक दुकानांचे कच्चे अतिक्रमण काढून टाकण्यात आले. त्यामुळे मोटवानी कॉम्प्लेक्स पुढचा भाग मोकळा झाला आहे. तसेच दूरसंचार कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला लागून असलेले सर्व दुकानांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतर अनेक दुकानदारांनी दिवसभर आपले दुकान बंद ठेवून येथील सामान हलवित असल्याचे दिसून येत होते. ३० डिसेंबर रोजी शहरातून जाणाऱ्या चारही राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडल्यानंतर आता अतिक्रमण हटविण्यात आल्याने या रस्ता व नाली बांधकामाला लवकरच सुरूवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अतिक्रमण हटवित असताना कोणतीही अनुचित घटना घडली नाही. चंद्रपूर मार्गावरील राहूल मशनरीज समोर अतिक्रमण हटवित असताना काही नागरिक जेसीबीच्या समोर उभे ठाकले होते. त्यांना पोलिसांनी बाजुला करून येथील अतिक्रमण हटविले. या पथकात विभाग प्रमुख अभियंते सुरज पुनवटकर, अभियंते गिरीष मैंद, उमेश शेंडे, सुरेश भांडेकर, शरद सोनटक्के, आर. पी. गिरोले, नितेश सोनवाने व इतर कर्मचारी हजर होते. (प्रतिनिधी)