शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील तलावात अतिक्रमण सुरूच

By admin | Updated: November 30, 2014 23:05 IST

मूल मार्गावर बाजाराजवळ असलेल्या तलावाच्या परिसरात अतिक्रमण करणे सुरूच आहे. मात्र याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे

गडचिरोली : मूल मार्गावर बाजाराजवळ असलेल्या तलावाच्या परिसरात अतिक्रमण करणे सुरूच आहे. मात्र याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र सदर कामसुध्दा रखडले आहे. शहराच्या मधोमध असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास शासनाला महसूल मिळण्याबरोबरच शहरातील नागरिकांनाही फेरफटका मारण्याचे ठिकाण उपलब्ध होईल. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी आवश्यक ते नियोजन करून काही प्रमाणात निधीसुध्दा उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून तलावाच्या पाळीचे काही प्रमाणात काम करण्यात आले. त्यामुळे सौंदर्यीकरण होईल, अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगत असतानाच अचानक या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम बंद पडले. तेव्हापासून ते काम कायमचे बंद आहे. मागील पाच वर्षांपासून काही नागरिकांनी या तलावामध्ये अतिक्रमण करून पक्की घरे बांधले आहेत. सध्या आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली असल्याने काही नागरिकांनी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. त्याचबरोबर काही नागरिकांनी तलावाच्या ओव्हरफ्लो भागातही अतिक्रमण करीत आहे. काही दिवस वाद चालल्यानंतर नगर परिषद त्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरविते. त्यामुळे अतिक्रमण थांबणार कसे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तलाव शहराच्या मध्यभागी असले तरी या तलावावर मालकी हक्क मात्र सिंचन विभागाचे आहे. या दोन विभागांच्या भांडणात या तलावाचे सौंदर्यीकरण रखडले आहे. त्याचबरोबर होत असलेल्या अतिक्रमणावरही अंकूश घालणे कठीण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: हस्तक्षेप करून या ठिकाणी केलेले अतिक्रमण काढावे, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)