शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी करणार संप

By admin | Updated: January 16, 2017 00:58 IST

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी व सरकारच्या कर्मचारी हितविरोधी धोरणाच्या विरोधात राज्य सरकारी व...

१८ ते २० जानेवारीपर्यंत काम बंद : राज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचारी सहभागीगडचिरोली : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी व सरकारच्या कर्मचारी हितविरोधी धोरणाच्या विरोधात राज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचारी १८ ते २० जानेवारी २०१७ पर्यंत लाक्षणिक संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने सदर लाक्षणिक संप केला जाणार आहे. या संदर्भातील नोटीस राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना देण्यात आले आहे. या संपात राजपत्रित अधिकारी, महासंघसुद्धा सहभागी होणार असून संप यशस्वी करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात प्रचार व प्रसार सभा आयोजित केल्या जात आहेत. मागील दोन वर्षांपासून कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला, निदर्शने केली. परंतु सरकारने धोरणात्मक व सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे सरकारच्या धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी तीन दिवसीय लाक्षणिक संपावर जाणार आहेत. या संपात जिल्ह्यातील राज्य सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन संप यशस्वी करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, उपाध्यक्ष संजय खोकले, राज्य सरकार कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. के. चडगुलवार, सरचिटणीस भाष्कर मेश्राम, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे सचिव लतीफ पठाण यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)या आहेत प्रमुख मागण्याराज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप केला जाणार आहे. प्रमुख मागण्यांमध्ये केंद्राप्रमाणे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, केंद्राप्रमाणेच पाच दिवसांचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीची मयोमर्यादा ६० वर्षे करावी. अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनीच पेंशन योजना लागू करावी, महिलांच्या बालसंगोपन रजेबाबत तातडीने निर्णय घ्यावा. सातव्या वेतन आयोगातील विविध संवर्गाच्या वेतन त्रुटीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, कंत्राटीकरण पद्धत रद्द करण्यात यावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावे, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले रोखण्याकरिता कडक कायदा करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. राज्यभर लाक्षणिक संप होणार आहे.