शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिभेच्या जोरावर मिळविला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:55 IST

बालपणापासूनच भजन, किर्तन, गायन, वादन असे संगीतमय वातावरणामुळे संगीताची ओढ व आकर्षण निर्माण झाले. काही दिवसानंतर प्रतिभाही निर्माण झाली. या प्रतिभेच्या जोरावर देसाईगंज तालुक्याच्या पाच युवकांनी संगीताच्या माध्यमातून रोजगार मिळविला आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । देसाईगंज तालुक्यातील पाच तरुणांची संगीत क्षेत्रात भरारी

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : बालपणापासूनच भजन, किर्तन, गायन, वादन असे संगीतमय वातावरणामुळे संगीताची ओढ व आकर्षण निर्माण झाले. काही दिवसानंतर प्रतिभाही निर्माण झाली. या प्रतिभेच्या जोरावर देसाईगंज तालुक्याच्या पाच युवकांनी संगीताच्या माध्यमातून रोजगार मिळविला आहे.संगीत मैफील संच तयार करून विविध सार्वजनिक व खासगी कार्यक्रमात हे पाच तरूण लोकांपुढे आपली कला सादर करीत आहेत. या संचात सावंगीचे गायक व तबलावादक यशवंत बगमारे, हार्मोनियम वादक उत्तम ढोरे, गायक भूषण ठाकरे, महेश दिवटे व एकलपूर येथील गायक अमोल भागडकर तसेच सोमलपूर येथील यशवंत बावणे या युवकांचा समावेश आहे.ग्रामीण व शहरी भागात होणारे नवरात्रोत्सव, शारदा-दुर्गा उत्सव, गणेशोत्सव आदी सार्वजनिक कार्यक्रमासह खासगी कार्यक्रमात हे पाच तरूण आपली कला लोकांसमोर सादर करून त्यांचे मनोरंजन करीत आहे. मराठी, हिंदी अशा फिल्मी तसेच गझल, कवाली, भावगीत, भक्तगीते, भिमगीत तसेच धार्मिक गीतांचा नजरांना या संचातर्फे सादर केला जातो. मागील तीन वर्षांपासून या पाच युवकांनी आपल्या कलेची झलक दाखविली आहे.शालेय जीवनापासून संगीत कलेची ओढसावंगी, एकलपूर येथील पाच तरूणांमध्ये शालेय वयापासून संगीत कलेची ओढ होती. शिक्षण घेत असतानाच या तरूणांनी सदर कला जोपासली व तिला विकसीत केली. विशेष म्हणजे, या पाच तरूणांचा कोणीही गुरू नाही. स्वत:च्या प्रतिभेच्या जोरावर अहोरात्र परिश्रम व सराव करून या तरूणांनी कलेमध्ये निपुणता मिळविली. शासकीय नोकरीसाठी वणवण भटकण्यापेक्षा तसेच बेरोजगाराचे चटके सहन करण्यापेक्षा त्यांनी कलेलाच रोजगाराचे साधन बनविले.