शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोग निर्मूलन ही सामाजिक जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:28 IST

कुष्ठरोगावर प्रभावी औषध असले तरी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याबाबत माहिती नाही. परिणामी कुष्ठरोगाचे अनिष्ट परिणाम कुष्ठरोग्याला भोगावे लागतात.

ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : जिल्हा सामान्य रूग्णालयात जनजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कुष्ठरोगावर प्रभावी औषध असले तरी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याबाबत माहिती नाही. परिणामी कुष्ठरोगाचे अनिष्ट परिणाम कुष्ठरोग्याला भोगावे लागतात. कुष्ठरोगाचा समूळ नायनाट करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.सहायक संचालक कुष्ठरोग कार्यालय गडचिरोलीच्या वतीने कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान खासदार अशोक नेते यांच्या हस्ते कुष्ठरोग निर्मूलन जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, सहायक संचालक कुष्ठरोग कार्यालयाचे जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. अमित साळवे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम, पर्यवेक्षक राजेश पराते, उमेश जंग्गावार, महेश दंदे, ठाकरे उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. नागरिकांमध्ये जागृती करून कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करणे शक्य असल्याने जिल्हाधिकारी शेखरसिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. अमित साळवे यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. चित्ररथावर कुष्ठरोगाबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर चित्ररथावर लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रिनवर १५ मिनिटांची चित्रफित दाखविली जात आहे. शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, गर्दीची ठिकाणे आदी ठिकाणी चित्ररथ नेऊन जनजागृती केली जात आहे. संपूर्ण जिल्हा पिंजून काढला जाणार आहे. खासदार अशोक नेते तसेच इतर मान्यवरांनी या कार्याची प्रशंसा केली. जनजागृती मोहीम अधिकाधिक दिवस चालू ठेवावी, असे आवाहन केले.जिल्हाभर फिरणार कुष्ठरोग चित्ररथकुष्ठरोगाबाबत जागृती करण्यासाठी स्वतंत्र चित्ररथ तयार करण्यात आला आहे. सदर चित्ररथ जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, गर्दीची ठिकाणे आदी ठिकाणी फिरविले जाणार आहे. कुष्ठरोग जनजागृतीची व्यापक प्रमाणातून जिल्ह्यात पहिल्यांदाच हाती घेण्यात आली आहे.