शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

योग्य वापराने होईल विजेची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:20 IST

उन्हाची तिव्रता वाढण्याबरोबरच एसी, कुलर, वॉटर कुलर, फ्रिज आदी साधनांचा वापर वाढत चालला आहे. या साधनांच्या वापरामुळे वीज मोठ्या प्रमाणात खर्च होते. तरीही या साधनांचा योग्य वापर केल्यास विजेची बचत शक्य आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा सल्ला : विजेच्या अपव्ययामुळे निर्माण होते पाणीटंचाई; प्रमाणित उपकरणेच वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाची तिव्रता वाढण्याबरोबरच एसी, कुलर, वॉटर कुलर, फ्रिज आदी साधनांचा वापर वाढत चालला आहे. या साधनांच्या वापरामुळे वीज मोठ्या प्रमाणात खर्च होते. तरीही या साधनांचा योग्य वापर केल्यास विजेची बचत शक्य आहे. विजेचा वापर कमी झाल्यास भरमसाठ बिल आल्याची ओरडही कमी होण्यास मदत होईल.नियोजन न केल्यास काही गोष्टींची तूट मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे विकासालाच नव्हे तर साध्या दैनंदिन व्यवहारालाही खीळ बसू शकते. अशा दोन गोष्टी म्हणजे वीज व पाणी. वीज निर्माण करताना पावसाच्या पाण्याचे संचय करून त्याला वाहते करावे लागते. या दोन्हीमध्ये त्यांचा योग्य वापर हीच त्यांची निर्मिती होत असते. जर अती वापर झाल्यास पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते म्हणून पाणी व विजेचा वापर हा योग्यच व्हायला पाहिजे. याची समज प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. वीजेचा वापर करण्याकरिता साहित्य, उपकरणे यांची निवड करताना त्यांचा दर्जा व चांगल्या कंपनीची आहे किंवा नाही हे तपासलेच पाहिजे. या कामासाठी विजेसंबंधीची कामे तज्ज्ञांकडून करून घेतली पाहिजेत.कित्येक खेडेगावात आजही विजेची सुविधा उपलब्ध झाली नाही. त्या गावांना आजही अंधारात जीवन जगावे लागत आहे. शहरी भागात राहणारी मंडळी बऱ्याचदा विजेचा अपव्यय करतात. तो अपव्यय कमी केला आणि वीजेची बचत केली तर अंधारात जीवन जगणाºयांनासुद्धा वीज मिळेल. वीज साठवून ठेवण्याच्या यंत्रणा महागड्या आहेत. विजेचे उत्पादन व वहन यासाठी लाखो मीटरच्या वाहिन्यांचे जाळे आणि उपकेंद्र निर्माण करावी लागतात. ज्या धातूमधून वीज वाहून नेली जाते त्या धातूमुळे काही प्रमाणात विजेची घट होते. याचाच अर्थ असा की, विजेचे वहन होत असताना, काही प्रमाणात वीज वाया जाते. यासाठी सगळ्यांनी विजेचा योग्य वापर केला तर विजेची बचत होईल.घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच ऊर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या उपकरणांचाच वापर करावा. भारतात सूर्यप्रकाशाचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे सूर्य प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करता येईल. विजेची उपकरणे स्वच्छ असतील तर जास्त ऊर्जा मिळेल आणि विजेचा वापर कमी होईल. इस्त्रीची निवड करताना, आॅटोमॅटिक इस्त्री खरेदी करावी. जेणेकरून विशिष्ट तापमानाला इस्त्री बंद होईल.कित्येक जण सायंकाळी दिवे लावतात आणि गरज नसतानासुद्धा रात्रभर ते चालू असतात. ज्या खोलीत कमी वावर असेल किंवा कोणीही नसेल त्या खोलीचे दिवे बंद करावेत. अनावश्यक दिवे गरज नसल्यास बंद करावेत. अनेक ठिकाणी विद्युतपंपाने टाकीत पाणी चढवावे लागते. बºयाचदा टाकी भरून वाहत असतानासुद्धा विद्युतपंप बंद केला जात नाही. यामुळे पाण्याचा आणि विजेचा अपव्यय होतो. यासाठी बाजारात स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध आहे. या यंत्रणेत पाण्याची टाकी भरली की विद्युतपंप बंद होतो. या यंत्रणेचा वापर केला तर हजारो युनीट वीज सहज वाचेल. वॉशिंग मशीन, ओव्हन, रोटीमेकर यांसारख्या वस्तू वापरताना टायमरचा वापर करावा.फ्रिज नियमितपणे डिफ्रॉस्ट कराफ्रिजमधून वस्तू काढताना आवश्यक वस्तू एकदाच काढाव्यात, फ्रिज वारंवार उघडू नये. सतत फ्रिज उघडल्याने फ्रिजचे तापमान बिघडून वीजेचा वापर वाढतो. ज्या फ्रिजमध्ये डीफ्रॉस्टची सुविधा आहे, तो फ्रिज नियमितपणे डिफ्रॉस्ट करावेत, बर्फ जमा झाल्यास मोटर चालू ठेवण्यासाठी फ्रीजला जास्त ऊर्जा लागते. रेफ्रिजरेटर आणि भिंत यांच्यामधे पुरेशी जागा ठेवावी, जेणेकरून रेफ्रिजरेटरच्या भोवती हवा सहजपणे खेळती राहील. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले पदार्थ झाकून ठेवावेत. झाकण न ठेवल्यामुळे अन्नातील बाष्प उडून जाते आणि कॉम्प्रेसरला अधिक काम करावे लागते.उपकरणे मेन स्वीचवरून बंद कराएसी, टीव्ही रिमोटने बंद केले जातात, पण त्याचा मेन स्विच बंद करण्यासाठी आळस केला जातो. असे न करता रिमोटने टीव्ही, एसी बंद केल्यानंतर लगेचच मेन स्विच बंद करावा. काही जण एकदा एसी बसवल्यानंतर तो खराब होईपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. एसीकडे दुर्लक्ष न करता दर महिन्याला एसीचा फिल्टर तपासून स्वच्छ करावा. यामुळे थंडावा वाढेल आणि विजेचा वापर कमी होईल. एसीची सर्व्हिसिंग वेळोवेळी करावी, प्रमाणित दर्जाचा एसी खरेदी केल्यास सदर एसीला विजेचा वापर कमी लागतो.