शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस वाढली

By admin | Updated: August 7, 2015 01:14 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक १४ सप्टेंबर २०१५ रोजी होणार आहे.

१९ जागांसाठी ११३ अर्ज : १४ सप्टेंबरला होणार मतदानचामोर्शी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक १४ सप्टेंबर २०१५ रोजी होणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला ५ आॅगस्ट रोजीपर्यंत एकूण १९ जागांसाठी ८२ उमेदवारांची ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस वाढली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघातून ११ उमेदवार निवडून द्यायचे असून यातील सर्व साधारणसाठी असलेल्या सात जागांसाठी ४० उमेदवारांनी ५४ नामांकन अर्ज दाखल केले आहे. महिलांसाठी दोन जागा राखीव असून येथून पाच महिलांनी सात उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. इतर मागासवर्गीयांच्या एका जागेसाठी आठ उमेदवारांनी १० नामांकन अर्ज दाखल केले आहे. तसेच भटक्या जाती व विमुक्त जमाती प्र्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन उमेदवारांनी पाच नामांकन अर्ज दाखल केले आहे. अशा प्रकारे ११ जागांसाठी ५६ उमेदवारांनी ७६ अर्ज दाखल करून विक्रम नोंदविला आहे. ग्राम पंचायत मतदार संघातून निवडून द्यावयाच्या चार जागांपैकी सर्वसाधारण गटाच्या दोन जागांसाठी नऊ उमेदवारांनी १४ नामांकन अर्ज, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी पाच उमेदवारांनी सहा अर्ज व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाच्या एका जागेसाठी चार उमेदवारांनी सहा नामांकन अर्ज दाखल केले आहे. व्यापारी व अडते मतदार संघातील दोन जागांसाठी चार उमेदवारांनी सहा अर्ज दाखल केले आहे. हमाल-मापारी व तोलारी मतदार संघातून एका जागेसाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल करून या निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा जि. प. चे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी स्वत: उमेदवारी अर्ज दाखल करून पूर्ण पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती शरद कोलेटीवार, माजी सभापती त्रियुगी नारायण दुबे, सुखदेव दादाजी नैताम, माजी पं. स. उपसभापती बंडू चिळंगे, पं. स. सदस्य प्रमोद भगत, चंद्रकांत दोशी, किशोर दोशी, विशेष दोशी, श्यामराव लटारे, विनायक आभारे, अरूण बंडावार, निकेश गद्देवार, बाबुराव कुकडे, नाजुक वाळके, विनायक पोरटे, गोसाई सातपुते या दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली असून चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)