लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर करत संचारबंदी लागू केली. यामुळे एकमेकांशी संपर्काचे प्रमाण कमी झाले असतानाही कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण मात्र कमी होण्याऐवजी वाढले आहे. १ ते १४ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात २७५७ जण पॉझिटिव्ह आढळले होते. १५ ते ३० एप्रिल या लॉकडाऊनच्या काळात मात्र तब्बल ८०२९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक कहर केला आहे. २ एप्रिलपासूनच कोरोना मृत्यूची संख्याही वाढत आहे. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर मृत्यूसोबतच पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही वाढत गेले. १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कोरोना नियंत्रणात येईल असा अंदाज बांधल्या जात होता. परंतु प्रत्यक्षात कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढत गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या आधी दरदिवशी २ ते ३ राहणारे मृत्यूचे प्रमाण गेल्या १५ दिवसात दररोज १५ ते २० मृत्यू एवढे वाढले. ही बाब प्रशासनासह सर्वांसाठीच चिंतेची आणि चिंतनाची ठरली आहे. या मृत्यूतील बहुतांश रूग्ण लगतच्या चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमधील आहेत.
ग्रामीण भागात रुग्ण वाढले, कारण? लसीकरणाला गांभीर्याने न घेणे, त्याबाबत मनात शंका-कुशंका ठेवण्यामुळे लस उपलब्ध असतानाही ती घेण्यास टाळाटाळ करणे.गेल्यावर्षी ज्या पद्धतीने गावकरी स्वत:च संचारबंदीची कडक अंमलबजावणी करत बाहेरच्या व्यक्तीला गावात प्रवेश नाकारत होते. ती पद्धत यावर्षी दिसली नाही.कोरोनाचे नियम न पाळता सार्वजनिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होणे, त्यातून संसर्ग पसरणे.
या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढलीप्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी घालून दिलेल्या विविध नियमांची सामाजिक जबाबदारी समजून अंमलबजावणी करण्याकडे केलेला कानाडोळा.सार्वजनिक कार्यक्रमातून होणारे एकत्रीकरण, लग्नासारखे कार्यक्रम पुढे ढकलण्याऐवजी नियम मोडून उत्साहाने पार पाडणे.ताप किंवा इतर लक्षणांकडे दुर्लक्ष करून वेळीच कोरोना चाचणी करण्यासाठी केलेली टाळाटाळ. यामुळे उपचारास विलंब होऊन रुग्ण गंभीर झाले.