शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आठ आदर्श शिक्षकांच्या सत्कारासाठी अद्यापही मुहूर्त गवसला नाही

By admin | Updated: November 27, 2014 23:35 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षकदिनी ८ आदर्श शिक्षकांची निवड केली. मात्र दोन महिन्याहून अधिक कालावधी लोटूनही या आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्याचा मुहूर्त

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षकदिनी ८ आदर्श शिक्षकांची निवड केली. मात्र दोन महिन्याहून अधिक कालावधी लोटूनही या आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्याचा मुहूर्त जिल्हा परिषद प्रशासनाला अद्याप गवसलेला नाही. जि.प. प्रशासनाच्या या तुलघकी कारभाराविषयी शिक्षक मंडळीमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांचा गौरव करून त्यांच्या प्रति उत्तराई होण्याचा हा सोहळा असतो. या दिवशी देशापासून ते गावापर्यंत विविध ठिकाणी गुरूजणांचा सत्कार करण्यात येते. गडचिरोली जिल्हा परिषदेने ५ सप्टेंबरला एकाही आदर्श शिक्षकाचा सत्कार केला नाही. मात्र सप्टेंबर महिन्यात उशिराने १२ पैकी केवळ ८ आदर्श शिक्षकांची निवड केली. या आदर्श शिक्षकांमध्ये गडचिरोली तालुक्यातील वसा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विलास नक्टूजी भांडेकर, आरमोरी येथील जि.प. शाळेचे शिक्षक गोपीनाथ तुकाराम नेवारे, देसाईगंज तालुक्यातील आमगाव जि.प. शाळेचे शिक्षीका सुनंदा बाबुराव पारटवार, कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा शाळेचे शिक्षक पुरंदर रामचंद्र चौधरी, चामोर्शी तालुक्यातील पेठतळा जि.प. शाळेचे शिक्षक वासुदेव आत्माराम कुनघाडकर, मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर जि.प. शाळेचे शिक्षक अनिल शंकर मार्तीवार, अहेरी तालुक्यातील वेलगुर जि.प. शाळेचे शिक्षक रमेश पांडूरंग कुसनाके, भामरागड तालुक्यातील धोडराज जि.प. शाळेचे शिक्षक लालदेव फकीराजी कोडापे यांची निवड करण्यात आली. नोव्हेंबर महिना संपत आला असतानाही या आदर्श शिक्षकांचा अद्याप जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सत्कारही केलेला नाही. सप्टेंबर महिन्यानंतर आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर हा कार्यक्रम होईल, असे गुरूजणांना वाटले. मात्र अद्यापही सत्काराची तारीख निश्चित न करण्यात आल्याने गुरूजणसुध्दा या सोहळ्याची प्रतीक्षा करीत आहे. एकूणच जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या तुलघकी कारभारामुळे हा प्रसंग ओढावल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)