शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

शैक्षणिक समस्या मार्गी लावणार

By admin | Updated: December 22, 2014 22:47 IST

सिरोंचा तालुक्यात शिक्षकांचे रिक्त पदे, अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. शाळांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या भागात शैक्षणिक विकास माघारलेला आहे.

सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात शिक्षकांचे रिक्त पदे, अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. शाळांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या भागात शैक्षणिक विकास माघारलेला आहे. या भागातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी समस्या मार्गी लावणार अशी ग्वाही आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली. तालुक्यातील असरअल्ली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शताब्दीपूर्ती व स्रेहमिलन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिरोंचा पंचायत समितीच्या सभापती लालुबाई मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर मडे, असरअल्लीचे सरपंच लक्ष्मण सिडाम, सिरोंचाचे उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ला, अहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार केशव मिश्रा, संवर्ग विकास अधिकारी पांडुरंग मरस्कोल्हे, गट शिक्षणाधिकारी पी. पी. पालगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार, असरअल्लीचे ठाणेदार खाटपे, जि. प. सदस्य व्यंकटेश शानगोंडा, पं. स. सदस्य कलावती झोडे, विश्वनाथम जैन, गजानन कलाक्षपवार, सर्वेश्वर गुडुरी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविकेतून शिक्षक खुर्शीद शेख यांनी असरअल्ली जि. प. शाळेची स्थापना १९१४ मध्ये सी. पी. अ‍ॅन्ड बेरारच्या काळात झाली, असे सांगितले. तसेच या शाळेच्या संरक्षण भिंती व इतर सुविधांसाठी शासन व प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही शेख यांनी यावेळी केली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या शाळेचे माजी विद्यार्थ्यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये समय्या सुव्वा, कोंडय्या पेंड्याला, विश्वनाथम जैन, रामवर्धन पडीशाला, राघवूलू जैन, विठ्ठल फकीर, सतिश जैन, भीमया धरणी, भूपती मोगलेश्वर, सीरिया सिडाम, लक्ष्मण राजू आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक आर. बी. दहागावकर यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्येने आजी, माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)