शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

रानभाजीद्वारे आर्थिक विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : प्राथमिक अवस्थेत मानव कंदमुळे, भाज्या यांचा आपल्या आहारात अधिक उपयोग करीत हाेता. कालांतराने तो ...

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : प्राथमिक अवस्थेत मानव कंदमुळे, भाज्या यांचा आपल्या आहारात अधिक उपयोग करीत हाेता. कालांतराने तो समुहाने राहू लागला. त्यामुळे त्याच्या खानपान पद्धतीत बदल झाला. सध्या रानभाज्यांचा वापर कमी झाला असला तरी माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रानभाजी उपयुक्त आहे. त्यामुळे रानभाजी विक्रीतून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास शक्य आहे, असे प्रतिपादन आ. डॉ.देवराव होळी यांनी केले.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र गडचिराेली व तालुका कृषी कार्यालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषी कार्यालय चामोर्शी येथे १३ ऑगस्ट रोजी आयोजित रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.देवराव होळी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, कृषी अधिकारी वसंत वळवी, प्रभारी तालुका कृषी अधिकारी नेहा फरांदे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, तालुका उमेद अभियान व्यवस्थापक विनोद बोबाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वसंत वळवी, संचालन तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक हेमंत उंदीरवाडे तर आभार श्रीनिवास रनमले यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, शेतकरी, बचतगटाचे सदस्य उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कृषी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

या भाज्यांचा हाेता स्टाॅलवर समावेश- रानभाजी महोत्सवात २६ महिला बचतगट, २४ पुरुष बचतगट, १६ वैयक्तिक बचतगट सहभागी झाले होते. रानभाज्यांमध्ये काटवल, दिंडा, तरोटा, कुडा, आमबुशी, पातूर, शेवगा, धोपा, केना, पानाचा ओवा, कपाळफोळी, बांबू, खापरखुटी, कुरडू, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोडभाजी, अंबाडी, मटारू, पिंपळ, भुई आवळा, सुरण, कवठ, उंबर आदींचा समावेश हाेता.

 

टॅग्स :agricultureशेतीDevrao Holiदेवराव होळी