शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील अर्थचक्र पुन्हा थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 05:00 IST

लाॅकडाऊन असल्याने प्रवासी मिळणार नाही, असा अंदाज बांधून एसटी प्रशासनाने बसचेे शेड्यूल्ड कमी करण्याच्या दृष्टीने अगाेदरच नियाेजन केले हाेते. ग्रामीण भागातील संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. चंद्रपूर, नागपूर, अहेरी मार्गावर काही बसफेऱ्या साेडण्यात आल्या. चंद्रपूरला जाणारे बरेच प्रवासी मिळाल्याने चंद्रपूरसाठी काही बसफेऱ्या साेडल्या. ग्रामीण भागातील काही प्रवासी बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत हाेते.

ठळक मुद्देसर्वच शहरांमधील बाजारपेठ बंद; दिवसभर रस्ते पडले ओस; अनेक ठिकाणी पाेलीस बंदाेबस्त

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने शनिवारी व रविवारी कडक लाॅकडाऊन लागू केले आहे. त्याचे पालन करीत जिल्हाभरातील बाजारपेठ शनिवारी बंद ठेवण्यात आली.  शासकीय कार्यालये, बॅंकाना असलेली सुटी यामुळे नागरिकही घराच्या बाहेर पडले नाही. त्यामुळे गडचिराेलीसह तालुकास्तरावरील रस्त्यांवरील वाहने व नागरिकांची वर्दळ थांबली हाेती. अधूनमधून एखादेच वाहन रस्त्यावर दिसत हाेते. 

एसटीचे १५ टक्केच शेड्यूल्ड सुटले लाॅकडाऊन असल्याने प्रवासी मिळणार नाही, असा अंदाज बांधून एसटी प्रशासनाने बसचेे शेड्यूल्ड कमी करण्याच्या दृष्टीने अगाेदरच नियाेजन केले हाेते. ग्रामीण भागातील संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. चंद्रपूर, नागपूर, अहेरी मार्गावर काही बसफेऱ्या साेडण्यात आल्या. चंद्रपूरला जाणारे बरेच प्रवासी मिळाल्याने चंद्रपूरसाठी काही बसफेऱ्या साेडल्या. ग्रामीण भागातील काही प्रवासी बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत हाेते. मात्र ग्रामीण भागातील मार्गांवर बसफेऱ्या साेडण्यात आल्या नाहीत. तसेच खासगी वाहतूकही बंद असल्याने या प्रवाशांची चांगलीच गाेची झाली.

भामरागड

भामगरागड शहरातील भाजीपाला, मेडिकल, काेल्ड्रिंक दुकाने व पेट्राेल पंप वगळता, इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. भामरागडच्या सभाेवताल असलेल्या गावांमध्येही लाॅकडाऊनचे पालन करण्यात आले. दुर्गम भागातील गावांमध्ये दुकानांसह सर्वच व्यवहार सुरळीत सुरू हाेते. लाॅकडाऊनचा फारसा प्रभाव या गावांमध्ये दिसून आला नाही. 

चामाेर्शी

चामाेर्शी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद हाेती. बहुतांश ग्रामीण भागातील दुकानेही बंद ठेवण्यात आली हाेती. बाजारपेठ व शासकीय कार्यालये बंद असल्याने, ग्रामीण भागातील नागरिक चामाेर्शी शहराकडे फिरकले नाहीत. त्यामुळे दिवसभर रस्ते ओस पडले हाेते. एखादे वाहन रस्त्याने फिरकत असल्याचे दिसून येत हाेते. 

आष्टी

शनिवारी आष्टी येथील चहा टपरी, पानठेले, जनरल स्टोअर, कापड दुकाने, सराफा दुकाने, सिमेंट, लोहा आदी दुकाने पूर्ण बंद होती. फक्त  दवाखाना व मेडिकल सुरू होते. रस्त्यावर नागरिकांची गर्दीही कमी होती.  आंबेडकर चौकात पोलीस तैनात होते. कामाशिवाय फिरणाऱ्या व मास्क न लावलेल्या लोकांना पोलीस अडवून विचारपूस करीत होते. शुक्रवारी मास्क न लावलेल्या वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे आज नागरिकांची वर्दळ कमी दिसत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेले नियम पोलीस विभागाकडून राबविले जात आहे. पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड हे सुद्धा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात फिरत असून, परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या