शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग उभारणीचा कालावधी पाचऐवजी तीन वर्षांचा होणार

By admin | Updated: October 10, 2015 01:27 IST

औद्योगिक विकास महामंडळांतर्गत इच्छुक व्यावसायिकांना एमआयडीसी परिसरात भूखंड उपलब्ध करून देण्यात येते.

उद्योग मित्र समितीची सभा : उद्योगातून रोजगार निर्मिती करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनगडचिरोली : औद्योगिक विकास महामंडळांतर्गत इच्छुक व्यावसायिकांना एमआयडीसी परिसरात भूखंड उपलब्ध करून देण्यात येते. मात्र त्यांच्याकडून उद्योग उभारणीस विलंब होतो. पूर्वी भूखंड वाटपापासून उद्योग सुरू होईपर्यंत पाच वर्षांचा ठेवण्यात आला होता. मात्र उद्योग निर्मिती झाल्याने भूखंड रिकामे राहतात. ही समस्या लक्षात घेऊन आता भूखंड वाटपापासून उद्योग सुरू होईपर्यंतचा कालावधी तीन वर्षांचा ठेवण्यात यावा, असा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत घेण्यात आला असून तशी शिफारसही एमआयडीसीच्या मुख्य कार्यालयाकडे करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी शुक्रवारी आयोजित उद्योग मित्र समितीच्या बैठकीत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी स्माल स्केल इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश इटनकर, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अनबत्तुला, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. पी. कोलते, महावितरण कार्यालयाचे अशोक म्हस्के, एमआयडीसीचे व्यवस्थापक नितीन गिरी, चंद्रपूर एमआयडीसीचे अतिरिक्त अभियंता एस. एम. मारे आदी उपस्थित होते. उद्योग सुरू न करणाऱ्या व्यावसायिकांकडून २० भूखंड परत घेण्यात आले असून ते सहा महिन्यात वितरित करण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल. तसेच २४ सप्टेंबर भूखंड वाटप समितीत तीन भूखंड वाटपासाठी मंजूर करण्यात आली असल्याची माहिती महाव्यवस्थापक कोलते यांनी बैठकीत दिली. भूखंडाचा सध्याचा दर १० रूपये स्केअर मीटर असून एवढ्या कमी भावात भूखंड उपलब्ध होत असल्याने भूखंड खरेदी करून विनावापर ठेवण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे भूखंडाचा दर १०० रूपये प्रती चौरस फूट करावा, मात्र जर सदर उद्योजकाने विहित मुदतीत भूखंड उद्योग वापरासंबंधी तसेच इमारत बांधणी नकाशा मंजुरीनंतर प्रत्यक्ष सुरू न केल्यास सदर उद्योजकाने ९० रूपये प्रती चौरस फुट दराने प्रशासनाला रक्कम परत करावी, अशी नाविण्यपूर्ण सूचना करण्यात आली. याला सर्वांनी संमती दर्शविली. तसेच या संदर्भात एमआयडीसी मुख्यालयासह धोरणात्मक निर्णय घेण्यास शिफारस करण्यात येईल, असे ठरविले.