शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

रवी येथे वन्य पशुंसाठी खोदतळ्याची निर्मिती

By admin | Updated: February 13, 2016 00:56 IST

वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या रवी येथे कक्ष क्र. ५५ व ५७ मध्ये खोदतळा खोदण्यात येत असून यामुळे वन्य पशुंना पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

आरमोरी : वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या रवी येथे कक्ष क्र. ५५ व ५७ मध्ये खोदतळा खोदण्यात येत असून यामुळे वन्य पशुंना पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून खोदतळ्याचे काम सुरू आहे. या कामावर रवी येथील २५० मजूर कामावर आहेत. वनपरिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांच्या प्रयत्नातून कामाला मंजुरी मिळाली. क्षेत्रसहायक के. बी. उसेंडी यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वनरक्षक नितीन गडपायले, आरमोरीचे वनरक्षक सतीश गजबे, रवीच्या उपसरपंच निर्मला तामसटवार उपस्थित होते. ३० मीटर बाय ३० मीटरचा खड्डा खोदण्यात येणार आहे. रवी परिसरातील वन्यजीवांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी खोदतळा खोदण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार वन विभागाने खोदतळ्याचे काम हाती घेतले आहे. एका महिन्यात काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. जंगलामध्ये इतरही ठिकाणी अशा प्रकारचे खोदतळे खोदल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार मिळण्याबरोबरच वन्य पशुंचीही तहाण भागणार आहे.