शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

जिल्ह्यात वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दुष्काळ

By admin | Updated: August 29, 2015 00:13 IST

आरोग्य सेवेत अत्यंत महत्त्वाचे पद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३१ पदे मंजूर आहेत.

निम्म्याहून अधिक पदे रिक्त : सात रुग्णालयांमध्ये वर्ग १ च्या डॉक्टरांचा अभाव गडचिरोली : आरोग्य सेवेत अत्यंत महत्त्वाचे पद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३१ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी केवळ १३ पदे भरण्यात आली असून १८ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे सात रुग्णालयांमध्ये वर्ग १ चा एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासन सेवेत रूजू झालेल्या पोलीस अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्वप्रथम ग्रामीण व दुर्गम भागामध्ये नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते. या आश्वासनानंतर गडचिरोली या मागास व नक्षलग्रस्त भागातील रिक्तपदांचा गुंता सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र हे आश्वासन प्रत्यक्षात उतरू शकले नाही. परिणामी अधिकारी वर्गाची ५० टक्क्याहून अधिक पदे अजूनही रिक्त आहेत. यापासून आरोग्य विभाग सुद्धा सुटला नाही.गडचिरोली जिल्ह्यात वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १३ पदे भरण्यात आली असून सुमारे १८ पदे रिक्त आहेत. शिक्षणाबरोबरच कामाचा अनुभव राहत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात वर्ग १ ची पदे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. रुग्णालयातील प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्याबरोबरच त्यांच्या अंतर्गत काम करीत असलेल्या इतर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून राहते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात नेमक्या याच पदांचा दुष्काळ असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालय चामोर्शी, धानोरा, आष्टी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड, कोरची या सात ग्रामीण रुग्णालयांमध्ये एकही वर्ग १ चा वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे कारभार सोपवून रुग्णालयाचा कारभार कसातरी हाकला जात आहे. त्याचबरोबर जिल्हास्थळावर असलेल्या सामान्य रुग्णालयात सुद्धा सुमारे ११ पदे रिक्त आहेत. गडचिरोली जिल्ह्यात खासगी रुग्णालयांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करू शकतील, एवढी ऐपतही येथील नागरिकांची नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरच रुग्णांना अवलंबून राहावे लागते. मात्र डॉक्टरांच्या रिक्तपदांमुळे याही आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालयात जाऊनही डॉक्टर मिळत नाही. त्यामुळे ये-जा करण्याचा खर्च वाया जात असल्याने अनेक दुर्गम भागातील रुग्ण अंथरूनाला खिळून बसणे पसंत करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)