शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल खरेदीसाठी निधीअभावी जनरेटर पडले धूळ खात

By admin | Updated: October 17, 2015 02:09 IST

आदिवासी विकास विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात विविध शाळा व वसतिगृह चालविले जातात.

विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास : सोलर वॉटर हीटरचेही झाले तुकडेगडचिरोली : आदिवासी विकास विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात विविध शाळा व वसतिगृह चालविले जातात. या शाळा व वसतिगृहांमध्ये विविध अडचणींचा सामना करीत विद्यार्थी राहत आहेत. शाळांना जनरेटर पुरविण्यात आले होते. मात्र यासाठी लागणाऱ्या डिझेलची तरतूद न झाल्याने हे जनरेटर धूळ खात पडून आहे. तर विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकासाठी सोलर कुकर व वॉटर हीटर देण्यात आले होते. ते आता तुकडे होऊन भंगारात जमा झाले असल्याचे वास्तव उघड झाले आहे. आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध आश्रमशाळा व वसतिगृहांना भेटी दिल्यावर हे विदारक चित्र समोर आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, अहेरी, भामरागड हे तीन आदिवासी विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत १०० वर अधिक शाळा जिल्ह्यात चालविल्या जातात. शाळा व विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याऐवजी शाळांसाठी मोठ्या प्रमाणावर वस्तूची खरेदी करून सरकारी पैशाचा विनियोग करण्याचे हीत गेल्या काही वर्षांपासून जोपासले जात असल्याने खरेदी करण्यात आलेल्या अनेक वस्तू आता भंगारात जमा झाल्या असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन वर्षांपूर्वी अनेक शाळांना जनरेटर पुरवठा करण्यात आले होते. जनरेटर चालविण्यासाठी लागणारे डिझेल खरेदी करण्याकरिता आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे हे जनरेटर आता धूळ खात पडून आहे. विद्यार्थी अंधारात अभ्यास करीत आहे. अनेक ठिकाणी या जनरेटरवर विद्यार्थ्यांनी कपडे वाळायला टाकल्याचे दिसून आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ४५ शासकीय आश्रमशाळांना २० वर्षांपूर्वी ४० हजार रूपये किंमतीचे सोलर कुकर पुरविण्यात आले होते. एकाही आश्रमशाळेत एकही दिवस सोलर कुकरचा वापर करून स्वयंपाक करण्यात आला नाही. हे सोलर कुकर शाळेच्या अडगळीच्या खोलीत जमा झाले आहे. भंगारात किलोच्या भावाने हे सोलर कुकर विकले जाण्याच्या स्थितीत आहे. तीन वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना आंघोळीकरिता गरम पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सोलर वॉटर हीटर पुरविण्यात आले. या सोलर वॉटर हीटरचे तुकडे शाळेच्या छतावर आता पडून आहेत. वॉटर हीटर असो किंवा कुकर असो ते किलोच्या भावाने भंगारात विकण्याची तयारी शाळांनी केली असल्याचा आरोप प्रा. दहिवडे यांनी केला.