शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद चालकामुळे चिमूकलीचे प्राण आले होते धोक्यात

By admin | Updated: May 3, 2017 01:30 IST

तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेचा चालक

महागाव पीएचसीतील घटना : चालकावर कारवाईची मागणी अहेरी : तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेचा चालक ३० एप्रिलच्या रात्री मद्यधूंद अवस्थेत असल्याने प्रकृती बिघडलेल्या सात महिन्याच्या मुलीला अहेरी रूग्णालयात भरती करण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे सदर बालिकेचा जीव धोक्यात आला होता. मद्यधूंद अवस्थेत असलेल्या चालकावर कारवाई करावी, अशी मागणी मुलीच्या आई वडिलांनी केली आहे. ३० एप्रिल रोजी रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी महागाव येथील अवनी मनोज रामटेके या सात महिन्याच्या चिमुलीची अचानक प्रकृती बिघडली. तिला तत्काळ महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी डॉ. अल्का उईके व अधिपरिचारिका डोंगरे उपस्थित होत्या. अवनीची प्रकृती गंभीर असल्याने तिला अहेरी उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. रूग्णवाहिकेचा चालक संतोष गेडाम हा मात्र मद्यधूंद अवस्थेत असल्याने रूग्णवाहिका चालविणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान चिमुकलीची प्रकृती आणखी गंभीर झाल्याने गावातील तरूण चेतन दुर्गे याने स्वत: रूग्णवाहिका चालवत इतर युवकांच्या मदतीने चिमुकलीला अहेरी उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. रूग्णवाहिका चालकाच्या निष्काळजीपणामुळे सात महिन्याच्या चिमुकलीचा जीव धोक्यात आला होता. संतोष गेडाम हा नेहमी दारू पिऊन राहत असतो, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याची शहानिशा करण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने स्वत: महागाव येथे जाऊन भेट दिली असता, चालक मद्यधूंद अवस्थेत आढळून आला. रूग्णवाहिका कुठे आहे, असा त्याला विचारले असता, रूग्णवाहिका उभी आहे. असे उत्तर दिले. मात्र त्यावेळी रूग्णवाहिका चिमुकलीला घेऊन अहेरी येथे गेली होती. गेडाम याच्यावर कारवाई वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. यावरून त्याला वरिष्ठांचे अभय असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी) रूग्णवाहिकेला अपघाताची शक्यता रूग्णवाहिकेचा चालक संतोष गेडाम हा नेहमी मद्यधूंद अवस्थेत राहतो. एखाद्या गंभीर स्थितीतील रूग्णाला दाखल करायचे असेल तर त्यावेळी मद्यधूंद अवस्थेतच तो वाहन चालवितो. त्यामुळे रूग्णवाहिकेला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या नागरिकांना संतोषचे दारूचे व्यसन माहित आहे. ते नागरिक आपल्या नातेवाईकाला रूग्णवाहिकेतून नेण्याऐवजी खासगी वाहनाने नेणे पसंत करतात.