शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘डेड फोन’मुळे बंद पडली एसटीच्या बसफेऱ्यांची चाैकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:43 IST

गडचिराेली : ‘गाव तिथे एसटी’ व ‘हात दाखवा, एसटी थांबवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन राज्य परिवहन महामंडळाने राज्यभर बससेवा सुरू ...

गडचिराेली : ‘गाव तिथे एसटी’ व ‘हात दाखवा, एसटी थांबवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन राज्य परिवहन महामंडळाने राज्यभर बससेवा सुरू केली. पण प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली दूरध्वनी सेवा मात्र काही दिवसांपासून बंद आहे. जिल्हा मुख्यालयातील एसटीचे विभागीय नियंत्रण कार्यालय आणि आगारातील दूरध्वनी पूर्णत: बंद झाल्याने एसटी बसेसची चाैकशी करायची कशी? असा सवाल प्रवाशांपुढे निर्माण झाला आहे.

गडचिराेली जिल्हा मुख्यालयी एसटीचे विभागीय कार्यालय आहे. या विभागांतर्गत ब्रह्मपुरी, अहेरी व गडचिराेली असे तीन आगार येतात. या तीन आगारांच्या बसगाड्या विदर्भातील पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये चालतात. तसेच तेलंगणा-छत्तीसगड अशी आंतरराज्यीय वाहतूक केली जाते. सर्वसामान्य लाेकांकडून एसटीला प्रवासासाठी माेठी पसंती आहे. मात्र गडचिराेली येथील विभागीय कार्यालय व बस आगारातील सर्वच दूरध्वनी क्रमांक बंद असल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. बसेसबाबतची चौकशी करायची कुठे? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

दीड वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वतीने गडचिराेली शहरातून धानाेरा मार्गाचे खाेदकाम करून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. बस आगारापुढेही हा मार्ग आता वाहतुकीसाठी तयार झाला आहे. हा मार्ग तयार करताना खाेदकामादरम्यान बीएसएनएलच्या दूरध्वनी सेवेची भूमिगत लाईन पूर्णत: तुटली. तेव्हापासून केबल व या लाईनची दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी एसटीतील दूरध्वनी बंद पडल्याचे समजते.

बाॅक्स...

बीएसएनएल कार्यालयाची उदासीनता

गडचिराेली आगाराच्या वतीने रस्ता खाेदकामादरम्यान केबल तुटल्याने दूरध्वनी सेवा बंद असल्याबाबतची तक्रार गडचिराेली येथील बीएसएनएल कार्यालयाकडे करण्यात आली. त्यानंतर निवेदन देऊन अधिकाऱ्यांपुढे ही समस्या मांडण्यात आली. एसटीच्या अधिकाऱ्यांनी दूरध्वनी सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र बीएसएनएल प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. परिणामी एसटीचे सर्व दूरध्वनी क्रमांक बंद पडले आहेत.

काेट...

दूरध्वनी सेवा बंद असल्याबाबत आपण बीएसएनएलच्या कार्यालयाला पत्राद्वारे कळविले आहे. मात्र दुरुस्तीचे काम अजूनही करण्यात आले नाही. त्यामुळे चाैकशी विभागासह सर्वच ठिकाणचे दूरध्वनी क्रमांक बंद आहेत.

- मंगेश पांडे, आगार प्रमुख, गडचिराेली

बाॅक्स...

या ठिकाणचे क्रमांक बंद

गडचिराेली एसटीच्या परिसरात तीन ठिकाणी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक आहेत. यामध्ये विभाग नियंत्रक कार्यालय, डेपाे मॅनेजर तसेच प्रवाशांसाठी असलेला चाैकशी विभाग, असे तीन स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक आहेत. याशिवाय डीपीओ म्हणजे आस्थापना व वाहतूक शाखेमध्ये तेच क्रमांक असून, त्यावरून संपर्क साधला जाताे. या सर्व ठिकाणचे दूरध्वनी क्रमांक गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत.