शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती

By admin | Updated: August 12, 2014 23:46 IST

बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायती अंतर्गत २५ ते ३० गावांत अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के पाऊस

कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायती अंतर्गत २५ ते ३० गावांत अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के पाऊस कमी झाल्याने धान, सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला व इतर पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. अत्यल्प पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पुढे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास नापिकी होण्याची शक्यता बळकावली आहे. मागील वर्षी बल्लारपूर तालुक्यात ७०० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मात्र यावर्षी पाऊस ३०० मि.मी. झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के पाऊस कमी आहे. बल्लारपूर तालुक्यात नऊ हजार हेक्टर शेती पिकाखाली असून त्यात तीन हजार हेक्टर धान, सोयाबीन तीन हजार ५०० हेक्टर, कापूस ८०० हेक्टर, तूर ३०० हेक्टर, भाजीपाला २०० हेक्टर व इतर पिके ५०० हेक्टरमध्ये घेण्यात येतात. यंदा ९० टक्के धान पीक घेण्यासाठी भात रोपाची निर्मिती शेतकऱ्यांनी केली. आतापर्यंत केवळ २० ते ३० टक्के रोवणी झाली आहेत. सध्या सोयाबीन, कापूस व तूर या पिकांची स्थिती चांगली आहे.मात्र पुढे पावसाची अशीच स्थिती कायम राहिल्यास पिके करपून नष्ट होण्याची भीती आहे. सध्या धान रोपे वाचविण्याची कसरत शेतकरी करीत आहे. नाल्याशेजारी असलेले तसेच विहिर सिंचनाची सोय असलेले शेतकरी कसेबसे धान पऱ्हे वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र वातावरणात उकाडा वाढला आहे. सूर्य आग ओकत आहे. पावसाचा थांगपत्ता नाही. अशात धान पऱ्हे वाचविणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. पावसाअभावी धान पऱ्हे करपली जात आहेत.